ICC World Cup 2023 : वर्ल्डकपच्या तोंडावर संघात अचानक मोठा बदल, स्फोटक फलंदाजाला वगळलं अन्...

ICC World Cup 2023 England Squad
ICC World Cup 2023 England Squad
Updated on

ICC World Cup 2023 England Squad : या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडने खूप आधी आपला संघ जाहीर केला होता. पण रविवारी 17 सप्टेंबरला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अचानक संघात मोठा बदल केला. स्फोटक फलंदाज जेसन रॉयला अंतिम संघातून वगळले आहे. या अचानक झालेल्या बदलात हॅरी ब्रूकला संघात स्थान देण्यात आले आहे.

ICC World Cup 2023 England Squad
ICC ODI Ranking : टीम इंडियाने जिंकला आशिया कप, तरी पाकिस्तान बनला ODI मध्ये नंबर वन? जाणून घ्या गणित

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला अवघे काही दिवस उरले आहेत. भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी 28 सप्टेंबर ही अंतिम तारीख ठेवली आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 10 पैकी 7 संघांची नावे समोर आली आहेत. इंग्लंडने जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात मोठे बदल केले आहेत. रविवारी निर्णय घेत क्रिकेट बोर्डाने स्फोटक फलंदाज जेसन रॉयला वगळताना हॅरी ब्रूकचा समावेश केला.

ICC World Cup 2023 England Squad
Team India Schedule : मोहीम आशिया कप 2023 फत्ते! पुढे काय?, जाणून घ्या टीम इंडियाचे शेड्यूल

हॅरी ब्रूकने 2022 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडसाठी खूप धावा केल्या होत्या. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत या फलंदाजाने 93 च्या सरासरीने एकूण 468 धावा केल्या होत्या. त्याने 3 शतकी खेळी खेळली आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 153 धावा होती.

ICC World Cup 2023 England Squad
Rohit Sharma : आशिया कप जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या वक्तव्याने वर्ल्डकप आधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन!

वर्ल्डकपसाठी इंग्लंडचा संघ -

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरान, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.