ICC World Cup: कोणाचा मुलगा... तर कोणाची पत्नी... अनोख्या पद्धतीने केली वर्ल्ड कपच्या संघाची घोषणा

ICC World Cup: कुटुंबातील सदस्यांकडून न्यूझीलंड संघ जाहीर
T20 World Cup 2022 New Zealand
T20 World Cup 2022 New Zealandesakal
Updated on

ICC World Cup: सोशल मीडिया माध्यमाचा वापर सर्व जण करतात, परंतु आपल्या चाहत्यांना आणि पाठीराख्यांना अधिक प्रभावीपणे जोडण्याचा विचारही कोणी केला नाही, असा नवा प्रयोग न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने केला. आगामी एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांनी आपला संघ निवडलेल्या खेळाडूंच्या कुटुंबामार्फत जाहीर केला.

कोणाचा मुलगा... कोणाची पत्नी... कोणाची आई... कुणाची आजी अशा प्रकारे कुटुंबातील सदस्य आपापल्या कुटुंबातील सदस्याची जर्सी क्रमांक आणि नाव जाहीर करत होता अशा प्रकारे १५ खळाडूंचा संघ जाहीर करण्याचा हा एकत्रित व्हिडीओ न्यूझीलंड मंडळाने प्रसिद्ध केला.

विल्यम्सनचे नाव त्याच्या मुलांनी, ट्रेंट बोल्डचेही नाव त्याच्या मुलांनी, राचिन रवींद्रचे नाव त्याच्या कुटुंबाने; तर जिमी निशामचे नाव त्याच्या आजीकडून अशा प्रकारे संघ जाहीर करण्याचा हा प्रकार फारच भावला.

विल्यम्सनचे पुनरागमन

■ मे महिन्यात आयपीएलध्ये सीमारेषेवर उडी मारून झेल पकडताना गुडघा दुखावलेला विल्यम्सन कुबड्या घेऊनच मायदेशी परतला होता. त्याचे विमानतळावरील छायाचित्र हळहळ निर्माण करणारे होते. त्यानंतर काही दिवसांत त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली.

विश्वकरंडक स्पर्धेतून तो जवळपास बाहेर जाणार असेच चित्र होते. खेळाडू नसला तरी संघ व्यवस्थापनात त्याची निवड करण्याचा निर्णयही न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने घेतला होता, परंतु जिगरबाज विल्यम्सनने कठोर मेहनत घेतली.

■ न्यूझीलंड संघ केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉन्वे (यष्टिरक्षक), लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), डॅरेल मिशेल, जिमी निशाम, ग्लेन फिलिप्स (यष्टिरक्षक), राचिन रवींद्र, मिशेल सँटनर, इश सोधी टीम साऊदी आणि विल यंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.