ICC World Cup 2023 Schedule : प्रतीक्षा संपली! वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या एका क्लिकवर

ICC World Cup 2023 Schedule
ICC World Cup 2023 Schedule
Updated on

ICC World Cup 2023 Schedule : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली आहे. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात आयसीसीने याची घोषणा केली. टूर्नामेंट सुरू होण्यासाठी फक्त 100 दिवस बाकी आहे.

ICC World Cup 2023 Schedule
Arjun Tendulkar Jemimah Rodrigues: "अंडर 12 ते आज..." अर्जुन तेंडुलकर सोबतच्या नात्याचा जेमिमाने केला मोठा खुलासा

100 दिवसांनंतर 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार वर्ल्ड कप

27 जून रोजी वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर 100 दिवसांनी म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि गतवर्षीचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार आहे. त्याच वेळी भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबरला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

भारताचे विश्वचषक 2023 चे वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू

ICC World Cup 2023 Schedule
Ind vs WI : 'गैर काय, सर्वच जण 'ते' कृत्य...' मुंबई क्रिकेट वर्तुळातून सर्फराझची पाठराखण

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपचा उद्घाटन आणि अंतिम सामना खेळल्या जाणार आहे. तर उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहे. विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.

वर्ल्ड कपचं वेळापत्रक

  • 5 ऑक्टोबर - इंग्लंड वि. न्यूझीलंड, अहमदाबाद

  • 6 ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर 1, हैदराबाद

  • 7 ऑक्टोबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, धर्मशाला

  • 8 ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर 2, दिल्ली

  • 8 ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 9 ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. क्वालिफायर 1, हैदराबाद

  • 10 ऑक्टोबर - इंग्लंड वि. बांगलादेश, धर्मशाला

  • 11 ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली

  • 12 ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर 2, हैदराबाद

  • 13 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, लखनौ

  • 14 ऑक्टोबर - इंग्लंड वि. अफगाणिस्तान, दिल्ली

  • 14 ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. बांगलादेश, चेन्नई

  • 15 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद

  • 16 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर 2, लखनौ

  • 17 ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर 1, धर्मशाला

  • 18 ऑक्टोबर - न्यूझिलंड वि. अफगाणिस्तान, चेन्नई

  • 19 ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे

  • 20 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू

  • 21 ऑक्टोबर - इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, मुंबई

  • 21 ऑक्टोबर - क्वालिफायर 1 वि. क्वालिफायर 2, लखनौ

  • 22 ऑक्टोबर - भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला

  • 23 ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान , चेन्नई

  • 24 ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश, मुंबई

  • 25 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर 1, दिल्ली

  • 26 ऑक्टोबर - इंग्लंड वि. क्वालिफायर 2, बंगळुरू

  • 27 ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई

  • 28 ऑक्टोबर- क्वालिफायर 1 वि. बांगलादेश, कोलकाता

  • 28 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. न्यूझिलंड, धर्मशाला

  • 29 ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ

  • 30 ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. क्वालिायर 2, पुणे

  • 31 ऑक्टोबर - पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता

  • 1 नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. दक्षिण आफ्रिका, पुणे

  • 2 नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर 2, मुंबई

  • 3 नोव्हेंबर - क्वालिफायर 1 वि. अफगाणिस्तान, लखनौ

  • 4 नोव्हेंबर - इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, अहमदाबाद

  • 4 नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू

  • 5 नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 6 नोव्हेंबर - बांगलादेश वि. क्वालिफायर 2, दिल्ली

  • 7 नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, मुंबई

  • 8 नोव्हेंबर - इंग्लंड वि. क्वालिफायर 1, पुणे

  • 9 नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. क्वालिफायर 2, बंगळुरू

  • 10 नोव्हेंबर - दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान, अहमदाबाद

  • 11 नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर 1, बंगळुरू

  • 12 नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता

  • 12 नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, पुणे

  • 15 नोव्हेंबर - पहिला उपांत्य सामना, मुंबई

  • 16 नोव्हेंबर - दुसरा उपांत्य सामना, कोलकाता

  • 19 नोव्हेंबर - फायनल, अहमदाबाद

ICC World Cup 2023 Schedule
ICC ODI World Cup Schedule: वनडे वर्ल्ड कपचे शेड्यूल आज होणार जाहीर! भारत-पाक सामन्यावर सर्वांचे लक्ष

स्पर्धेत 10 संघांमध्ये होणार 48 सामने

यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये 48 सामने खेळल्या जाणार आहेत. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या मेगा स्पर्धेसाठी आधीच पात्र झाले आहेत.

उर्वरित दोन संघ या महिन्यात झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील. पात्रता स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि यजमान झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.