ICC World Cup 2023 Schedule : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 46 दिवस चालणार असून एकूण 48 सामने 10 ठिकाणी खेळल्या जाणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकाबाबत पाच महत्त्वाचे मुद्दे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानशी मुकाबला करणार आहे.
आयसीसीच्या वेळापत्रकाचा पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने आपल्या दोन सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. तिला चेन्नईत अफगाणिस्तान आणि बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियात खेळायचे नव्हते. इतकंच नाही तर पीसीबीही अहमदाबादमध्ये भारताचा सामना करायला तयार नव्हता, पण आयसीसीनं ते ऐकलं नाही.
आयसीसी विश्वचषक 2023 गतवेळेप्रमाणे राउंड रॉबिन स्वरूपात खेळला जाईल. सर्व 10 संघ राऊंड रॉबिन फॉर्मेट अंतर्गत एकूण 9 लीग सामने खेळतील. अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
एकदिवसीय विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईत आणि दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकाता येथे होणार आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.
विश्वचषक उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे हे बाद फेरीचे सामने नियोजित दिवशी होऊ शकले नाहीत, तर हा सामना दुसऱ्या दिवशी खेळला जाईल. सर्व बाद फेरीचे सामने दिवस-रात्रीचे असतील, जे दुपारी 2 पासून सुरू होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.