ICC World Cup 2023 : टीम इंडियालातील स्टार खेळाडूंना मिळणार ब्रेक; न्यूझीलंड सामन्यानंतर...

ICC World Cup 2023
ICC World Cup 2023 esakal
Updated on

ICC World Cup 2023 Team India : वनडे वर्ल्डकपमध्ये भारताने आपले सलग चार सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. आता त्यांचा सामना गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या न्यूझीलंड विरूद्ध रविवारी आपला पाचवा सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी उत्सुक असणार आहे.

ICC World Cup 2023
Ind vs Nz Pitch Report : जो जिंकेल तो एक नंबर, धरमशाला मधील खेळपट्टीवर कुणाचा चालणार सिक्का?

दरम्यान, टीम इंडियातील स्टार खेळाडूंना बीसीसीआय एक खूशखबरी दिली आहे. भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि इतर खेळाडूंना वर्ल्डकपदरम्यानच ब्रेक मिळणार आहे. न्यूझीलंडविरूद्धचा सामना झाल्यानंतर भारतीय संघ एक छोटा ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहेत.

न्यूझीलंडचा सामना झाल्यानंतर भारतीय संघ थेट 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरूद्ध सामना खेळणार आहे. या दोन सामन्यांमध्ये सात दिवस आहेत. यावेळी खेळाडूंना ब्रेक देण्यात येणार आहे. वर्ल्डकपच्या थकवणाऱ्या शेड्युलमध्ये हा छोटा ब्रेक खेळाडूंना रिफ्रेश करेल.

ICC World Cup 2023
Video Viral : चिन्नास्वामी स्टेडियमवर राडा! 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा, अन् चाहत्याची पोलिसाशी झाली बाचाबाची

श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये 30 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान आशिया कप आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भारतीय संघातील सर्व प्रमुख खेळाडू खेळले होते. बीसीसीआयच्या प्रवक्त्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'खेळाडूंना दोन ते तीन दिवस ऐच्छिक ब्रेक देण्यात आला आहे. जेणेकरून ते आपल्या घरी जाऊ शकतील. हा ब्रेक न्यूझीलंड सामन्यानंतर देण्यात येणार आहे.'

'दोन सामन्यांमध्ये सात दिवसांचा गॅप असल्याने खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.'

न्यूझीलंडच्या सामन्यानंतर भारतीय संघ लखनौमध्ये 26 ऑक्टोबरला एकत्र जमतील. भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंचा प्रवास आणि वर्कलोड पाहून सराव सत्राचे नियोजन केले आहे.

ICC World Cup 2023
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे Points Table मोठी उलथापालत! पाकिस्तान टॉप-4 मधून बाहेर तर...

पुढच्या टप्प्यात भारतीय संघ महत्वाचे सामने खेळणार आहे. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंसाठी हा ब्रेक फलदायी ठरू शकतो. भारतीय संघ हा यंदाच्या वर्ल्डकपमधील एकमेव असा संघ आहे की तो आपले सर्व 9 लीग सामने वेगवेगळ्या 9 व्हेन्यूवर खेळणार आहेत.

भारतीय संघ वर्ल्डकप सामन्यापूर्वी 48 तास आधी नेटमध्ये सराव करण्यासाठी पोहचणार आहे. न्यूझीलंडचे खेळाडू सामन्यापूर्वी एक दिवस आधी सराव करताना दिसणार आहेत. भारतीय संघाने आपले वेगवान गोलंदाज अजून रोटेट केलेले नाहीत.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या डाव्या पायाचा घोटा दुखावला आहे. त्यामुळे भारतीय संघात एक बदल होणार आहे. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला आपले काही पर्याय चाचपणे शक्य होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.