Video: अंतराळात झालं ICC World Cup 2023च्या चषकाचं अनावरण! पाहा भन्नाट व्हिडिओ

आजवरचा हा आकारानं सर्वात मोठा वर्ल्ड कप आहे.
World Cup 2023 Trophy
World Cup 2023 Trophy
Updated on

नवी दिल्ली : यंदा भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठीचा भव्य चषक समोर आला आहे. विशेष म्हणजे या चषकाचं अनावरण अंतराळातील स्ट्रॅटोस्फेअर अर्थात स्थितांबरात करण्यात आलं आहे. अशा प्रकारे थेट अंतराळातून हा चषक गुजरातमधील अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भव्य सोहळ्यात अवतरला. (ICC World Cup 2023 trophy unveiled in space stratosphere Watch awesome video)

World Cup 2023 Trophy
World Cup Qualifier: झिम्बाब्वेनं जिंकलं! 'वन डे'त दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक धाव फरकानं जिंकला सामना

या चषकाला पृथ्वीपासून १ लाख २० फूट उंचीवर असलेल्या स्थितांबरात सोडताना एका मोठ्या फुग्यावर बांधण्यात आलं. जेव्हा हा फुगा चषकासह अंतराळ सोडण्यात आला तेव्हा त्याला कॅमेरेही जोडले होते. या कॅमेऱ्यांमध्ये काही आश्चर्यकारक फोटोही टिपण्यात आले. या चषकाचा २०२३चा दौरा आजवरचा सर्वात मोठा दौरा असेल. या दौऱ्यादरम्यान जगभरातील विविध देश आणि शहरांमधील नागरिकांना हा प्रतिष्ठित चषक पहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)

World Cup 2023 Trophy
Team India : शिखर धवनला पुन्हा बनवणार टीम इंडियाचा कर्णधार, मोठी अपडेट आली समोर

आयसीसीच्या प्रेसनोटनुसार, २७ जूनपासून आयसीसीच्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपच्या चषकाचा आयोजक भारत, कुवैत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली आदी १८ देशांचा दौरा असेल. या दौऱ्यात विविध देशांतील नागरिकांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा चषक पहायला मिळेल. (Marathi Tajya Batmya)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा यांनी ट्विट करुन म्हटलं की, अंतराळात CWC23 ट्रॉफीचे अनावरण झाल्यामुळं क्रिकेट जगतासाठी हा जगाबाहेरचा क्षण आहे. अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या पहिल्या अधिकृत क्रीडा ट्रॉफींपैकी एक होण्याचा हा एक मैलाचा दगड आहे. भारतातील ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी दौर्‍यासाठी खरोखरच एका आकाशगंगेला सुरुवात झाली आहे. (Marathi Tajya Batmya)

World Cup 2023 Trophy
Team India : शिखर धवनला पुन्हा बनवणार टीम इंडियाचा कर्णधार, मोठी अपडेट आली समोर

क्रिकेटप्रमाणं भारताला इतर दुसरा कुठला खेळ एकत्र ठेवत नाही. वर्ल्डकपसाठी भारतात मोठा उत्साह आहे. कारण आम्ही सहा आठवडे चालणाऱ्या या सोहळ्यात जगातील सर्वश्रेष्ठ १० टीम्सच्या मेजवाणीसाठी सज्ज आहोत. वर्ल्डकपच्या उलट्या गिनतीसह चषकाचा दौरा खास आयोजनाचा भाग बनतो आहे. चषकाच्या दौऱ्याची सुरुवात २७ जूनपासून भारतातून होईल. जगभराचा दौरा केल्यांतर ४ सप्टेंबर रोजी हा चषक आयोजक असलेल्या भारतात परतेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()