आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 2 जूनला चार्टर्ड फ्लाइटमधून भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. 24 मे रोजी भारतीय संघ मुंबईत एकत्र येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. (icc world test championship final wriddhiman saha tests covid 19 negative will fly england with team india ) भारतीय संघासोबत वृद्धीमान साहा इंग्लंडला जाणार का? याबाबत संभ्रम होतो. आयपीएल स्पर्धेदरम्यान ज्या खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यात साहाचाही समावेश होता.
वृद्धिमान साहा (wriddhiman saha) आणि केएल राहुल (kl rahul) यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला त्यावेळी दोघांच्या फिटनेसवर ते इंग्लंड दौऱ्याला टीम इंडियासोबत असणार का? याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. केएल राहुलच्या दुखापतीसंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण साहा भारतीय संघासोबत इंग्लंडला जाण्यास फिट असल्याचे समजते.
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर वृद्धिमान साहालाजवळपास 17 दिवस क्वारंटाईन रहावे लागले. त्याचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला असून क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करुन तो घरी परतला आहे. साहा 24 मे रोजी भारतीय संघाला जॉईन होणार असल्याचे समजते. 2 जूनला तोही टीमसोबत इंग्लंडला रवाना होण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना रंगणार आहे. साउथहॅम्पटनच्या मैदानात साहाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे. याच कारण रिषभ पंत सध्याच्या घडीला दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे साहा स्टँडबाय खेळाडू म्हणूनच संघासोबत राहिल.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.