French Open : इगाने फ्रेंच ओपनवर कोरलं नाव; 18 वर्षाच्या कोकोचं स्वप्न अधुरं...

Iga Swiatek Defeat Coco Gauff In French Open 2022 Women's Single Final
Iga Swiatek Defeat Coco Gauff In French Open 2022 Women's Single Finalesakal
Updated on

पॅरिस : फ्रेंच ओपन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात क्रमवारीत अव्वल असणाऱ्या इगा स्विटेकने 18 वर्षाच्या कोको गौफचा 6-1, 6-3 असा पराभव करत दुसरे फ्रेंच ओपन जिंकले. याचबरोबर तिने सलग 35 सामने जिंकण्याचा व्हिनस विल्यम्सच्या रेकॉर्डची बरोबरी देखील केली. व्हिनसने 2000 मध्ये हा विक्रम केला होता. याचबरोबर स्विटेकने सलग सहावे विजेतेपद पटकावले. (Iga Swiatek Defeat Coco Gauff In French Open 2022 Women's Single Final)

Iga Swiatek Defeat Coco Gauff In French Open 2022 Women's Single Final
फेंच ओपनमध्ये व्यत्यय; आपल्याकडे फक्त 1028 दिवस उरलेत...

फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये आज पहिल्या गेमपासूनच जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या इगा स्विटेकने आपले वर्चस्व राखले. तिने 18 वर्षाच्या अनुभवाने कमी असलेल्या कोको गौफला चांगलेच दमवले. इगाने पहिल्या सेटमधील 4 गेम जिंकले होते. तर कोको गौफला आपले खाते देखील उघडता आले नव्हते. मात्र त्यानंतर गौफने इगाला प्रतिकार करण्यास सुरूवात केली. तिने एक गेम जिंकत झुंज दिली. मात्र अनुभवी इगाने पहिला सेट 6-1 असा आपल्या नावावर केला.

Iga Swiatek Defeat Coco Gauff In French Open 2022 Women's Single Final
French Open : सचिन तेंडुलकरला नदालची 'माणुसकी' भावली

यानंतर दुसऱ्या सेटमध्ये देखील कोको गौफने पहिले दोन गेम जिंकत दमदार सुरूवात केली. मात्र त्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या इगा स्विटेकने सलग दोन गेम जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर इगाने सामन्यावर नियंत्रण मिळवण्यास सुरूवात केली. इगाने दुसऱ्या सेटमधील कोकोवरील आघाडी 5-2 अशी वाढवली. त्यानंतर कोकोने आपला तिसरा गेम जिंकला. मात्र तोपर्यंत कोकोच्या हातून दुसरा सेट आणि सामना देखील निघून गेला होता. अखेर 18 व्या वर्षी पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याचे कोको गौफचे स्वप्न स्वप्नच राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.