French Open 2024 : इगा स्वैतेकची हॅट्ट्रिक; तिसऱ्यांदा कोरलं फ्रेंच ओपनवर नाव

Iga Swiatek : क्ले कोर्टची महाराणी म्हणून इगा नावारूपाला येत आहे. तिनं चौथ्यांदा फ्रेंच ओपन जिंकली.
Iga Swiatek
French Open 2024esakal
Updated on

French Open 2024 : फ्रेंच ओपन 2024 महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इगा स्वैतेकने जॅसमिन पौलिनीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. इगाचं हे चौथं फ्रेंच ओपनचं टायटल आहे.

आजच्या अंतिम सामन्यात पोलिश टेनिसपटू इगाचा मुकाबला इटलीच्या जॅसमिन पौलोनीशी होता. जॅसमिनने पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमची फायनल गाठली होती. अनुभवी इगाने जॅसमिनचा दोन सेटमध्येच पराभव करत सामना जिंकला.

इगाने पहिला सेट हा 6-2 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पौलोनी थोडा प्रतिकार करेल असं वाटलं होतं. मात्र इगाने दुसरा सेट देखील 6-1 असा जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली.

Iga Swiatek
French Open 2024 : कार्लोस अलकराझने गाठली फ्रेंच ओपनची फायनल; नदालचा मोठा विक्रम मोडण्याची संधी

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इगाने सेमी फायनलमध्ये युएस ओपन चॅम्पिनय कोको गौफचा 6-2, 6-4 असा पराभव केला. दुसरीकडे जॅसमिन पौलिनीने 17 वर्षाच्या अँद्रीवाचा 6-3, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

Iga Swiatek
Shreyas Iyer: 'बॅट माझ्या हातात...' BCCI ने वार्षिक करारातून वगळ्याबद्दल श्रेयस अय्यरनं सोडलं मौन

इगाने या विजेतेपदासोबतच अनेक विक्रमांना देखील गवसणी घातली.

- इगा ही हेनिननंतर सलग तीन फ्रेंच ओपन महिला एकेरीचे टायटल जिंकणारी टेनिसपटू ठरली आहे. हेनिनने 2005 ते 2007 अशी सलग तीन विजेतेपदं पटकावली होती.

- याचबरोबर इगा ही आपल्या पहिल्या 5 ग्रँड स्लॅम फायनल जिंकणारी तिसरी टेनिसपटू ठरली आहे.

- सेरेना विलियम्सनंतर माद्रित, रोम आणि फ्रेंच ओपन जिंकणारी इगा ही पहिलीच महिला टेनिसपटू ठरली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.