Igor Stimac: उभ्या आयुष्यात कधी मला.... AIFF वर निशाणा साधत इगॉर म्हणाले भारतीय फुटबॉल बंदीवासात

Igor Stimac on AIFF Indian Football Controversy: भारतीय फुटबॉल विश्वात मोठ्या हालचाली होत असून इगॉर यांनी एआयएफएफवर गंभीर आरोप केले आहेत.
Igor Stimac
Igor Stimac Indian Footballesakal
Updated on

Igor Stimac Statement : भारतीय फुटबॉल जगतात सध्या इगॉर स्टिमॅक यांच्या हकालपट्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने नुकेतच भारतीय पुरूष वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांना पदावरून हटवल्याची घोषणा केली. ही घोषणा भारताचा कतारविरूद्ध पराभव झाल्यानंतर करण्यात आली होती. भारतीय फुटबॉल संघ फिफा वर्ल्डकप क्वालिफिकेशनच्या तिसऱ्या फेरीत पोहचू शकला नाही. याचबरोबर भारताच्या वर्ल्ड रँकिंगमध्ये देखील घसरण झाली.

Igor Stimac
IND vs BAN Playing 11 : भारत बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात बुमराहला देणार विश्रांती, रोहित प्लेईंग 11 मध्ये करणार किती बदल?

दरम्यान, आता इगॉर स्टिमॅक यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'माझ्या ह्रदयाला वेदना झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षाचा सुंदर प्रवास आचानक थांबत आहे. हा प्रवास एआयएफएफमधील काही लोकांमुळे थांबत आहे. भारतीय फुटबॉल संघ एका वेगळ्याच अॅप्रोचने काम करत होती आणि अचानक प्रोजेक्ट बंद झाला आहे.'

इगॉर स्टिमॅक पुढे म्हणाले , 'मी इथे खुल्या दिलाने आलो होतो मात्र तुमचं फुटबॉल हे बंदीवासात आहे. माझ्या कारकिर्दीत मला आतापर्यंत कधी काढून टाकण्यात आलं नव्हतं. ही पहिलीच वेळ आहे. हे चुकीचं होतं. त्यामुळे माझी एआयएफएफला प्रतिक्रिया देखील तशीच असेल.

Igor Stimac
IND vs AFG : तब्बल 4 वर्षानंतर अफगाणिस्तान संघाचं होणार भारत 'होम' ग्राऊंड, 'या' मैदानावर होणार सामने

एआय़एफएफच्या नोटीसला उत्तर देताना, स्टिमॅक यांनी एआयएफएफने पूर्ण न केलेली आश्वासने आणि कराराच्या उल्लंघनाची अनेक उदाहरणे समोर ठेवली आहेत. भारत तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही तर पद सोडण्याची इच्छा इगॉर यांनी व्यक्त केली होती. याचबरोबर त्यांनी त्यांच्याबरोबरच एआयएफएफच्या संपूर्ण पॅनलनं देखील पराभवाची जबाबदारी स्विकारून बाहेर पडावं अशी विनंती केली आहे.

इगॉर यांनी हे वक्तव्य सोशल मीडियावरून चाहत्यांशी आणि माध्यमांशी संवाद साधताना केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.