Igor Stimac : मी इथं चाटूगिरी करण्यासाठी आलो नाही... भारतीय फुटबॉल संघाचे कोच एवढे का भडकले?

Igor Stimac
Igor Stimacesakal
Updated on

Igor Stimac : भारतीय वरिष्ठ पुरूष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक हे मध्यंतरी चांगलेच चर्चेत आले होते. त्यांना मैदानावरील आक्रमक वर्तनाबद्दल रेड कार्ड दाखवण्यात आले होते. मात्र इगोर यांच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय फुटबॉल संघ हा रँकिंगमध्ये शंभरच्या आत आला आहे. (Indian Football Team)

इगोर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी इंडियन सुपर लीगमधील क्लबना वर्ल्डकप, एशियन गेम्स, वर्ल्डकप क्वालिफायर आणि एशियन कपच्या तयारीसाठी भारतीय संघातील खेळाडूंना वेळेवर रिलीज करावे अशी विनंती केली आहे.

इगोर यांनी इशारा देताना आपल्या समोर फार कठिण काळ उभा ठाकला असल्याचे सांगितले. मात्र याचवेळी त्यांची जीभ घसरली. त्यांनी मी भारतात चाटूगिरी करण्यासाठी आलो नाही. मी खरं बोलायला घाबरत नाही असं वक्तव्य केलं.

Igor Stimac
Neeraj Chopra Mother : विषय पाकिस्तान, हरियाणा नाहीये... नीरज चोप्राच्या आईने दिलेल्या उत्तरानं सगळेच गपगार

इगोर स्टिमक म्हणाले की, 'माझ्या भाषेबद्दल मला माफ करा मात्र मी मदत करण्यासाठी भारतात आलो आहे. जर तुम्हाला मी मदत करावी असे वाटत असेल तर मला तुम्हाला सत्य सांगावे लागेल. तुम्हाला याचा सामना करावा लागेल. तुम्ही मला अडचणींवर मात करण्यासाठई मदत करू शकता. तुम्ही मला सांगू शकता की आम्ही काहीच बदलणार नाही. कोच कृपया तुम्ही घरी जा. मी आनंदाने घरी बसेन. आपण मित्र राहू.

भारताचे कौतुक करताना इगोर म्हणाले की, 'भारतात जगातील सर्वात चांगलं बुद्धीचातुर्य आहे. तुम्ही मला सांगताय की आपण कॅलेंडर वर्षाच्या वेळेचे नियोजन करू शकत नाही. राष्ट्रीय संघाकडे काम करण्यासाठी पुरेसा वेळ आहे का? का इतर काही गोष्टी देखील आहेत?

मला हे बोलायला काही अडचण नाही. कारण हे सत्य आहे. जो कोणी मला खोटं ठरवू इच्छितो त्यांना मी सार्वजनिकरित्या माझ्याशी वादविवाद करा असे आव्हान देतो. मला ते सांगू शकतात की अडचण कुठं आहे?

Igor Stimac
Umar Akmal : मुलीच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसेच नव्हते; अकमल म्हणातो माझे 'दुष्मन' देखील यातून जाऊ नयेत

इगोर स्टिमक यांनी हे वक्तव्य आघाडीचे क्लब आणि राष्ट्रीय संघ व्यवस्थापन यांच्यात खेळाडूंना भारतीय संघाच्या सामन्यासाठी रिलीज करण्यावरून वाद झाला आहे. भारत पुढच्या आठवड्यात थायलंडमध्ये किंग्ज कप स्पर्धा खेळणार आहे. यानंतर चीनमध्ये 23 वर्षाखालील आशियाई स्पर्धेच्या क्वालिफायर सामने होणार आहेत. भारतीय संघ हांगझूमध्ये 19 सप्टेंबरला होणाऱ्या आशियाई गेम्समध्ये देखील सहभागी होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.