Kieron Pollard VIDEO : पोलार्डने मैदानाबाहेर मारले षटकार; एक चाहता तर...

Kieron Pollard ILT20
Kieron Pollard ILT20esakal
Updated on

Kieron Pollard ILT20 : वेस्ट इंडीजचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंटरनॅशन लीग टी20 स्पर्धा खेळत आहे. जरी पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या पॉवर हिटिंग क्षमतेत कोणताही बदल झालेला नाही. ILT20 लीग स्पर्धेत खेळताना पोलार्डने धडाकेबाज फलंदाजी करत षटकारांची बरसात केली. त्याचे दोन षटकार तर मैदानाबाहेरच्या रस्त्यावर जाऊन पडले.

Kieron Pollard ILT20
Gautam Gambhir : या प्रश्नाचं उत्तरच नाही... गंभीर पांड्याच्या कॅप्टन्सीवर जाम भडकला

ILT20 स्पर्धेत एमआय अमिराती ही मुंबई इंडियन्सचीच एक टीम खेळते. या संघाचा कर्णधार किरॉन पोलार्ड आहे. रविवारी 29 जानेवारीला एमआय अमिरातीचा सामना डेझर्ट वायपर्स यांच्याबरोबर झाला. या सामन्यात कर्णधार पोलार्डने धडाकेबाज फलंदाजी करत आपल्या संघाला 157 धावांनी विजय मिळवून दिला.

शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पोलार्डने 19 चेंडूत 50 धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत पोलार्डने 4 षटकार आणि 4 चौकार लगावले. त्याने 263.15 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. या खेळीदरम्यान पोलार्डने मारलेले दोन षटकार थेट स्टेडियम बाहेरच्या रस्त्यावर जाऊन पडले.

Kieron Pollard ILT20
IND vs NZ: दोष कोणाचा शिक्षा कोणाला? मॅचच्या आधी यांच्यामुळे बदलली खेळपट्टी अन् क्युरेटरची झाली हकालपट्टी

यातील एका षटकारावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या चाहत्याने पोलार्डने मारलेला चेंडू घेतला आणि पळ काढला. तर दुसऱ्या चाहत्याने रस्त्यावर पडलेला चेंडू उचलून मैदानात पुन्हा फेकला. ILT20 ने या दोन षटकारांचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर एमआय अमिरातीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 241 धावा चोपल्या. पोलार्डने 50, मोहम्मद वसीमने 86 धावा केल्या. तर डेझर्ट वायपर्सचा संपूर्ण संघ 12.1 षटकात 84 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. अमिरातीने 157 धावांनी सामना जिंकला.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.