इंस्तंबूल येथे 9 मे ते 20 मे दरम्यान वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप होत आहे. यात टोकयो ऑलम्पिकमध्ये ब्रांझ मेडल मिळविलेल्या लोवलिना बोर्गोहेन हिचा चेन निन-चीन हिच्याशी पहिली लढत होणार आहे. चेन ही वर्ड बॉक्सिंग चॅम्पियन आहे. लोवलिना ची लढत तैपेई बॉक्सरशी होणार आहे. २०१८ मध्ये तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलंय. तर २०१६ मध्ये तिने कांस्य पदक जिंकलंय. या स्पर्धेत दोन वेळची एशियन चॅम्पियन पूजा राणी (81 कीलो) नंदीनी आणि निखत जरीन (52 किलो) यांना देखील तगड्या स्पर्धकाचा सामना करावा लागणार आहे. पूजाचा सामना वर्ल्ड चॅम्पियनमध्ये दोन वेळची कांस्यपदक विजेती हंगेरीची बॉक्सर टीमिया नेगी हिच्याशी सामना होणार आहे, तर नंदीनीचा सामना मोरोक्काच्या खदीजा अल् मरदी हिच्याशी होणार आहे.
लोवलिनाचा आत्मविश्वास चांगलाय, टोकीयोतील सेमीफायनलमध्ये चेन नीन चीन ला हरवल्यानंतर पहिल्यांदाच दोघींमध्ये सामना होणार आहे. चेन नीन चीन ही ५ फूट सात इंच उंच असून, लोवलिना तिच्यापेक्षा ३ इंचाने उंच असल्याने याचा फायदा तिला होणार आहे.
आतापर्यंत भारताने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये ३६ पदक पटकाविली आहेत. यात ९ सुवर्ण, ८ रौप्य व १९ कांस्पदकांचा समावेश आहे. रशिया आणि चीननंतर भारत तिसरा सर्वाधिक पदकं मिळवणारा देश आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.