Ind vs Afg 1st T20I : अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात ही असणार भारताची Playing 11, या खेळाडूंना मिळणार संधी?

India vs Afghanistan 1st T20 News |
India vs Afghanistan 1st T20 News Marathi News
India vs Afghanistan 1st T20 News Marathi Newssakal
Updated on

India vs Afghanistan Playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीत होणार आहे. यात फार थोडे दिवस उरले आहेत.

7 जानेवारीला संध्याकाळी या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. असे मानले जाते की निवडकर्त्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबाबत निर्णय घ्यायचा होता, त्यामुळे संघाची घोषणा करण्यासाठी आणखी काही दिवस लागले. बरं, आता संघ समोर आहेत आणि पहिल्या सामन्यात भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असू शकते हे पाहू...

India vs Afghanistan 1st T20 News Marathi News
Ind vs Agf : केएल राहुलला अफगाणिस्तान टी-20 मालिकेत का मिळाली नाही संधी? मोठे कारण आले समोर

बीसीसीआयने या मालिकेसाठी एकूण तीन सलामीवीरांची निवड केली आहे. रोहित शर्माचे तब्बल 14 महिन्यांनंतर कर्णधारपदी पुनरागमन झाले असून, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनाही संघात संधी देण्यात आली आहे.

पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल सलामीची जबाबदारी पार पाडू शकतो, असे मानले पाहिजे. याचाच अर्थ यशस्वी जैस्वालला पहिल्या सामन्यात संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येणार हे नक्की आहे. तो बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करत आहे, त्यामुळे तो टी-20 मध्ये कशी फलंदाजी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

India vs Afghanistan 1st T20 News Marathi News
Ind vs Afg T20 : भारताच्या टी-20 संघातून 7 मोठी नावे गायब! 'या' स्टार खेळाडूंना नाही मिळाली जागा

रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय बीसीसीआयने इतर सर्व युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा फलंदाजीसाठी उतरू शकतात. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. रिंकू सिंगलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत शिवम दुबेला संधी देण्यात आली आहे. त्याच्या आगमनाने संघाला अष्टपैलू खेळाडूचा पर्याय मिळाला आहे. गोलंदाजीसोबतच तो शेवटच्या काही षटकांमध्ये धावाही करू शकतो. त्याचवेळी, जर संघाला आपली फलंदाजी वाढवायची असेल, तर अक्षर पटेललाही संधी दिली जाऊ शकते. मात्र, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. अक्षर पटेलसोबत संघ जाण्याची शक्यता आहे.

वेगवान गोलंदाजीवर नजर टाकल्यास अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे एकूण पाच गोलंदाज असतील, म्हणजे शिवम दुबेला संपूर्ण चार षटके टाकावी लागतील. सामन्याच्या दिवशी कळेल की, रोहित शर्मा कोणत्या इलेव्हनसह मैदानात उतरतो.

पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर , अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.