Ind Vs Afg 2nd T20I Match :
भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात अफगाणिस्तानचा 6 विकेट्सनी पराभव करत तीन टी 20 सामन्यांची मालिका 2 - 0 अशी जिंकली. अफगाणिस्तानचे 173 धावांचे आव्हान भारताने 15.4 षटकात पार केलं. भारताकडून यशस्वी जयस्वालने 67 तर शिवम दुबेने नाबाद 63 धावा केल्या.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने अफगाणिस्तानला 172 धावात रोखले. अफगाणिस्तानने आजच्या सामन्यात आक्रमक शैलीत फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र भारतीय फिरकीपटूंनी अफगाणिस्तानला ठराविक अंतराने धक्के दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने 3 तर अक्षर पटेल आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नईबने सर्वाधिक 57 धावा केल्या.
शेवटच्या षटकात अफगाणिस्तानने 4 विकेट्स गमावल्या. त्यातील दोन अर्शदीपने घेतल्या तर दोन फलंदाज धावबाद झाले.
भारताने अफगाणिस्तानचे 173 धावांचे आव्हान 15.4 षटकात पार केले.
162-4 (13.4 Ov) : करीम जनतने 34 चेंडूत 68 धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वालला बाद केलं. त्यानंतर त्याच षटकात जितेश शर्माला शुन्यावर बाद करत भारताला पाठोपाठ दोन धक्के दिले.
149-2 (12 Ov) : भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने दुसऱ्या सामन्यात संधी मिळताच धडाकेबाज फलंदाजी केली. तर विराट कोहली 29 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या शिवम दुबेने जळपास 200 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतकी खेळी करत अफगाणिस्तानला सलग दुसऱ्या सामन्यात तडाखे दिले.
अर्शदीपच्या शेवटच्या षटकात 4 विकेट्स पडल्या. अर्शदीपने दोन विकेट्स घेतल्या तर दोन फलंदाज शेवटच्या दोन चेंडूत धावबाद झाले. त्यामुळे अफगाणिस्तानचा डाव 20 षटकात 172 धावात संपुष्टात आला.
134-6 (17.1 Ov) : स्लॉग ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगने 21 चेंडूत 23 धावा करणाऱ्या नजिबुल्ला जादरानला बाद करत सहावा धक्का दिला.
110-5 (15.1 Ov) : भारताच्या फिरकीपटूंनी दुसऱ्या टी 20 सामन्यात दमदार गोलंदाजी केली. अक्षर पटेल आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
91-4 (11.3 Ov) : अक्षर पटेलने गुलबदिन नईबला 57 धावांवर बाद करत रोहित शर्माचं टेन्शन दूर केलं. नईबने 35 चेंडूत 57 धावा ठोकल्या होत्या.
80-3 (9.4 Ov) : गुलबदिन नईबने अर्धशतक ठोकत अफगाणिस्तानला 10 षटकात 80 धावांच्या पार पोहचवले.
60-3 (6.5 Ov) : पॉवर प्लेनंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या शिवम दुबेने अझमतुल्ला ओमरजईचा 2 धावांवर त्रिफळा उडवला.
AFG 53/2 (5.4) : अफगाणिस्तानचा फलंदाज गुलबदीन नईबने पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करत भारतीय गोलंदाजांना चोपले. मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अक्षर पटेलने इब्राहीम जादरानला बाद करत ही जोडी फोडली.
अफगाणिस्तानने फलंदाजी करताना पहिल्या दोन षटकात आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. रहमनुल्ला गुरबाजने काही चांगले फटके मारले होते. मात्र अखेर रवी बिश्नोईने तिसऱ्या षटकात त्याला 14 धावांवर बाद केले.
दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. 14 महिन्यानंतर विराट कोहली टी 20 संघात परतला असून यशस्वी जयस्वाल देखील फिट झाल्याने तो प्लेईंग 11 मध्ये खेळणार आहे. या दोघांसाठी शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांनी जागा करून दिली आहे.
अफगाणिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
इंदूर टी-20 मध्ये भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित आहेत. कारण या सामन्यातून स्टार फलंदाज विराट कोहली पुनरागमन करत आहे.
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर आज संध्याकाळी 7 वाजता भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामना सुरू होणार आहे. नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.