India vs Afghanistan Playing XI : रोहित शर्मा जवळपास 14 महिन्यांनंतर भारतीय टी-20 संघात परतला आहे, तेव्हा त्याला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. आधी त्याला लाँग फॉरमॅट म्हणजे टेस्टपासून लहान फॉरमॅटशी स्वतःला जुळवून घेणे आणि प्लेइंग इलेव्हन निवड.
भारत-अफगाणिस्तान टी-20 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडताना रोहित आणि कंपनीला दोन गोष्टींचा विचार करावा लागेल. हा सामना आज गुरुवारी (11 जानेवारी) मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी राशिद खानच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवडकर्त्यांनी निवडलेल्या भारतीय संघात प्रत्येक स्थानासाठी एकापेक्षा जास्त पर्याय आहेत. उदाहरणार्थ, कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आहेत. शुभमन गिल टी-20 आणि वनडे सामन्यांमध्ये सलामीला येतो होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात यशस्वी जैस्वालने रोहितसोबत ओपनिंग केल्याचे सर्वांनी पाहिले. त्यावेळी शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर उतरला होता.
याच कारणामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यातही तो तिसऱ्या क्रमांकावर दिसणार आहे. विराट कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही. प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की, विराटने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या सामन्यात विश्रांती घेत आहे.
सलामीवीरांप्रमाणेच रोहित शर्मालाही यष्टिरक्षकाची निवड करताना कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. एकीकडे जितेश शर्मा आहे, ज्याने आतापर्यंत मिळालेल्या संधींमध्ये चांगली कामगिरी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला संजू सॅमसन आहे. नुकतेच संजू सॅमसननेही शतक झळकावले होते. या शतकामुळे संजूचा दावा अधिक भक्कम झाला आहे.
यष्टिरक्षकापेक्षा गोलंदाज निवडणे कठीण होणार आहे. मोहालीचा खेळपट्टीचा अहवाल आणि इतिहास पाहता येथे 3 वेगवान गोलंदाजांसह जाणे योग्य ठरेल. भारतीय संघात अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान हे तीन वेगवान गोलंदाज आहेत.
रोहित शर्माच्या गोलंदाजीत तीन वेगवान गोलंदाज अर्शदीप, मुकेश, आवेश, एक फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि एक अष्टपैलू अक्षर पटेल असण्याची शक्यता आहे. तथापि, अनेक माजी क्रिकेटपटूंना असेही वाटते की, भारतीय संघ व्यवस्थापन 3 गोलंदाज आणि 2 अष्टपैलू खेळाडूंसोबत जाऊ शकते.
भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.