IND vs AFG T20 Squad : टीम इंडिया विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा! राशिद खान संघात पण खेळणार नाही सामना

IND vs AFG T20 Squad
IND vs AFG T20 Squadsakal
Updated on

Afghanistan Squad For T20I Series vs India : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी 19 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रशीद खानच्या अनुपस्थितीत नुकत्याच झालेल्या यूएई विरुद्धच्या मालिकेत संघाचे नेतृत्व इब्राहिम झद्रान करणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने मालिका 2-1 अशी जिंकली.

IND vs AFG T20 Squad
IND vs ENG Test : BCCI ने टीम इंडियाच्या A स्कॉडची केली घोषणा! रजत पाटीदार अन् सरफराज खानची संघात एन्ट्री

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने राशिदचा संघात समावेश केला आहे. पण पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर तो पुनर्वसन करत असल्याने तो कोणताही सामना खेळू शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुजीब उर रहमान हा देखील संघाचा एक भाग आहे. इकराम अलीखल बॅकअप यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात आला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे होणार आहे. यानंतर दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर आणि तिसरा आणि शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 17 जानेवारीला बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ - इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.