Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात अश्विनचा ​​पत्ता कट? कर्णधार रोहित 'या' खेळाडूला देणार संधी

Ashwin's chance cut in match against Afghanistan?
ind vs afg team india playing 11 against afgansitan r ashwin
ind vs afg team india playing 11 against afgansitan r ashwinsakal
Updated on

Ind vs Afg Team India Playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वर्ल्डकप 2023 चा नाववा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. शुभमन गिल खेळणार नाही हे आधीच निश्चित झाले आहे. कारण तो अद्याप पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी या सामन्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

ind vs afg team india playing 11 against afgansitan r ashwin
World Cup 2023 : संघ टेन्शनमध्ये! शतक ठोकल्यानंतर दिग्गज खेळाडू रुग्णालयात दाखल, जाणून द्या नेमकं काय झालं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चा भाग असलेल्या रविचंद्रन अश्विनला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर जाऊ लागू शकतो. त्याच्या जागी मोहम्मद शमीचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

2019 च्या वर्ल्डकपमध्ये शमीने अफगाणिस्तानविरुद्ध घातक गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात तो हॅट्ट्रिक घेण्यात तो यशस्वी ठरला होता. अश्विनबद्दल बोलायचे तर अरुण जेटली स्टेडियममध्ये त्याची आकडेवारी काही विशेष असे चांगली राहिली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धही तो फारसा प्रभावी दिसला नाही. अशा स्थितीत त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.

ind vs afg team india playing 11 against afgansitan r ashwin
Ind vs Afg : पाकविरुद्ध सामन्याआधी भारतीयांना चुका सुधारण्याची संधी, प्लेइंग-11 मध्ये किती होणार बदल?

काही दिवसांपूर्वी याच मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात आफ्रिकन संघाच्या फलंदाजांनी विरोधी गोलंदाजांना चोप देत वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. आफ्रिकेने 428 धावा केल्या होत्या.

टीम इंडियाचे फलंदाजही असेच काहीतरी करण्याचा विचार करत असतील. दिल्लीची खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य आहे. चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क आहे. अशा स्थितीत आज या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे.

हे असू शकते टीम इंडियाचे प्लेइंग-11

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविचंद्रन अश्विन/मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()