Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये मोठा बदल, 'हा' खेळाडू होणार बाहेर?

ODI WC 2023 Ind vs Afg Team India Playing xi
ODI WC 2023 Ind vs Afg Team India Playing xi
Updated on

ODI WC 2023 Ind vs Afg Team India Playing xi : चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता वर्ल्डकपमधील पुढील सामन्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांचा पुढचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यात शुभमन गिल खेळणार नाही हे निश्चित झाले आहे. तो बरा असला तरी त्याला पूर्णपणे तंदुरुस्त व्हायला अजून वेळ लागेल. अशा परिस्थितीत इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरतील. पण यावेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी काही बदल पाहायला मिळतील का? हे जाणून घेऊ...

ODI WC 2023 Ind vs Afg Team India Playing xi
Ind vs Afg : ईशान किशन ठरतोय अवघड जागेचं दुखणं…; शुभमनच्या अनुपस्थितीमुळे रोहित ब्रिगेडचा 'बिघडला गेम'

टीम इंडियाने आपल्या पहिल्या वर्ल्डकप सामन्यात खेळला, तेव्हा इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर खाते न उघडताच बाद झाले होते. म्हणजे आघाडीचे तीन फलंदाज शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. 200 धावांचं टार्गेट होतं, म्हणून विराट कोहली आणि केएल राहुलनं सामना वाचवला.

मात्र शून्यावर आऊट होऊनही या तिन्ही खेळाडूंच्या जागेला कोणाताही धोका नाही हे निश्चित आहे. विराट कोहली आणि केएल राहुल हे शेवटच्या सामन्याचे हिरो होते, त्यामुळे त्यांच्या जागेचा कोणाताही विचार करण्याची गरज नाही. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजाही खेळताना दिसणार आहेत. पण भारतीय संघात एक बदल होताना दिसत आहे तो म्हणजे रविचंद्रन अश्विनच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळू शकते.

ODI WC 2023 Ind vs Afg Team India Playing xi
ENG vs BAN: 16 चौकार अन् 5 षटकार... मलानच्या तुफानी शतकाने बाबर - गिलचा विक्रम उद्वस्त

अश्विन चेन्नईत खेळणार हे आधीच ठरले होते. कारण ते त्याचे घर आहे आणि त्याला सर्वकाही चांगले समजते. एवढेच नाही तर तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडूनही बराच काळ खेळला आहे. पण दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर तो तितकीच चमकदार गोलंदाजी करू शकेल की नाही हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे कर्णधार आणि संघ व्यवस्थापन मोहम्मद शमीवर डाव खेळू शकतात.

अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()