IND vs AUS 1st ODI : कर्णधार राहुलची मोठी खेळी, सिराजसह 'या' 4 खेळाडूंना बाहेर, अश्विनचे ​​पुनरागमन अन्...

IND vs AUS 1st ODI : कर्णधार राहुलची मोठी खेळी, सिराजसह 'या' 4 खेळाडूंना बाहेर, अश्विनचे ​​पुनरागमन अन्...
Updated on

IND vs AUS 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जात आहे. कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया 4 मोठे बदल घेऊन मैदानात उतरत आहे.

ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांचा भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करण्यात आला आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे, तर रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघात परततील.

IND vs AUS 1st ODI : कर्णधार राहुलची मोठी खेळी, सिराजसह 'या' 4 खेळाडूंना बाहेर, अश्विनचे ​​पुनरागमन अन्...
Pakistan Squad World Cup 2023 : वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! आशिया कपमधील 3 खेळाडू बाहेर

भारताने गोलंदाजी का निवडली?

नाणेफेक जिंकल्यानंतर केएल राहुल म्हणाला की, मोहालीच्या मैदानावर पाठलाग करणे सोपे आहे त्यामुळे प्रथम गोलंदाजी करेल. वर्ल्डकपपूर्वी संघाला काही गोष्टींवर काम करायचे आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ जगातील सर्वोत्कृष्ट असून त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी करायला आवडेल.

मोहालीची खेळपट्टी

मोहालीची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. येथे वेगवान गोलंदाजांना नक्कीच मदत मिळेल पण चेंडू बॅटवरही चांगला येईल. या मैदानावर खूप धावा होतात. दव पडल्यामुळे रात्री धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे होईल.

भारताचे प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन - पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, शॉन अॅबॉट आणि अॅडम झाम्पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.