IND Vs AUS 1st ODI : पहिल्या सामन्यात भारताचा विजय; शुभमन गिलचा पुन्हा एकदा धमाका, केएलची कर्णधाराला साजेशी खेळी

IND Vs AUS 1st ODI : पहिल्या सामन्यात भारताचा विजय; शुभमन गिलचा पुन्हा एकदा धमाका, केएलची कर्णधाराला साजेशी खेळी
Updated on

India Vs Australia 1st ODI Live Score : भारताने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्स राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचे 277 धावांचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने 74 तर ऋतुराज गायकवाडने 71 धावांची खेळी केली.

वनडेचा कोड क्रॅक करण्यात अखेर सूर्यकुमारला यश आलं. त्याने सावध सुरूवातीनंतर अर्धशतकी (50) खेळी केली. त्याने कर्णधार केएल राहुलने देखील अर्धशतकी (58) खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

तत्पूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद केला. ऑस्ट्रेलियाला 50 षटकात 10 बाद 276 धावांपर्यंतच मजल मारता आली. कांगारूंनकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर जॉश इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावांचे योगदान दिले. भारताकडून जडेजा, अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

कर्णधाराचे अर्धशतक, सूर्याचीही साथ 

केएल राहुलने कर्णधाराला साजेशी अशी अर्धशतकी खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून टेवले. त्याला सूर्यकुमार यादवने देखील चांगली साथ दिली.

179-3 (31 Ov) : केएल राहुल - इशान किशनने डाव सावरला

भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाड (71) आणि शुभमन गिल (74) यांनी 142 धावांची दमदार सलामी दिल्यानंतर भारताचा डाव घसरला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर आलेला श्रेयस अय्यर देखील 4 धावांची भर घालून माघारी गेला. पाठोपाठ गिल देखील बाद झाला.

यानंतर आलेल्या केएल राहुल आणि इशान किशन यांनी डाव सावरत भारताला 31 षटकात 180 धावांपर्यंत पोहचवले.

IND 129/0 (20.1) : भारताची दमदार सलामी

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 277 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी अर्धशतके ठोकत भारताला 20 षटकात 129 धावांपर्यंत मजल मारून दिली.

IND 31/0 (4.1) : भारताची आक्रमक सुरूवात 

भारताचा सलामीवीर शुभमन गिलने आक्रमक सुरूवात केली. त्याला ऋतुराज गायकवाडने चांगली साथ देत पहिल्या 4 षटकात जवळपास 7.75 च्या सरासरीने धावा केल्या.

276-10 (50 Ov) : कांगारूंच्या कर्णधाराची झुंज 

ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील आणि तळातील फलंदाजांनी झुंजापणा दाखवत भारताविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात सर्वबाद 276 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने 9 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला. तर जॉश इंग्लिसने 44 धावा तर स्टॉयनिसने 29 धावांचे योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेतल्या.

214-5 (43 Ov) : कांगारू 200 पार 

मोहम्मद शमी आणि भारतीय फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 186 धावात गारद झाल्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि जॉश इंग्लिस यांनी भागीदारी रचत संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला.

155-3 (31 Ov) : जडेजाने जोडी फोडली मात्र मार्नसने डाव सावरला 

डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचली. मात्र रविंद्र जडेजाने अर्धशतक ठोकणाऱ्या वॉर्नरला आणि त्यानंतर मोहम्मद शमीने स्टीव्ह स्मिथला बाद करत ही जोडी फोडली.

परंतु मार्नस लाबुशेन आणि कॅमरून ग्रीन यांनी डाव सावरत ऑस्ट्रेलियाला 31 षटकात 150 धावांच्या पार पोहचवले.

98-1 (17.4 Ov) वॉर्नरचे अर्धशतक 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या धक्क्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने सावध सुरूवात केली. मात्र सेट झाल्यानंतर वॉर्नरने आक्रमक फलंदाजी करत 50 चेंडूत 51 नाबाद 51 धावा ठोकल्या. स्मिथनेही आपला गिअर बदलला.

AUS 62/1 (13.5) : वॉर्नर - स्मिथने डाव सावरला

ऑस्ट्रेलियाला मार्शच्या रूपाने पहिला धक्का बसल्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरत 12 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला अर्धशतक पार करून दिले.

IND Vs AUS 1st ODI Live Score: मार्शचा दूसऱ्या चेंडू चौकार अन् शमीने चौथ्या चेंडूवर केली शिकार! कांगारूला पहिला धक्का

चार धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियन संघाची पहिली विकेट पडली आहे. मिचेल मार्श चार चेंडूत चार धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला आऊट केले.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

भारतीय संघाने जिंकली नाणफेक

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात राहुल भारताचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे असल्याचे राहुल म्हणाला. या कारणास्तव त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारत बनणार नंबर 1, जाणून घ्या समीकरण

टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केले तर संघ 116 गुणांसह वनडेत नंबर 1 बनेल.

रविचंद्रन अश्विनला मिळणार का संधी ?

या मालिकेसाठी रविचंद्रन अश्विनची संघात निवड करण्यात आली आहे. 19 महिन्यांनंतर तो एकदिवसीय संघात परतला आहे. दुखापती अक्षर पटेलच्या जागी त्याला संघात स्थान मिळाले आहे. अश्विन या मालिकेत खेळणार हे निश्चित मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.