IND vs AUS: मुंबई खेळल्या जाणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया ODI सामन्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा?

मुंबईतील मॅचवर संकटाचे ढग; जाणून घ्या सर्व अपडेट
 ind vs aus1st odi match weather report mumbai-live-update-hardik-pandya-steve-smith
ind vs aus1st odi match weather report mumbai-live-update-hardik-pandya-steve-smith
Updated on

India vs Australia ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. कसोटी मालिकेत 2-1 अशा विजयानंतर टीम इंडिया वनडेतही विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.

हार्दिक पांड्या मुंबई वनडेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाप्रमाणेच पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ संघाची धुरा सांभाळण्यास सज्ज झाला आहे.

 ind vs aus1st odi match weather report mumbai-live-update-hardik-pandya-steve-smith
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया ODI थरार होणार सुरू! केव्हा, कधी अन् कुठे पाहाणार मॅच, घ्या जाणून

मात्र, उभय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या एकदिवसीय सामन्यापूर्वी मुंबईतील सामन्यादरम्यान उद्याचे हवामान कसे असेल ते जाणून घेऊया. AccuWeather च्या अहवालानुसार 17 मार्चला मुंबईचे हवामान पूर्णपणे स्वच्छ होईल. दीर्घकाळात पावसाची शक्यता नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल, त्यामुळे मैदानावरील खेळाडूंना उष्णता आणि आर्द्रतेचा सामना करावा लागू शकतो. दिवसाचे कमाल तापमान 31 अंश तर किमान तापमान 24 अंश राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय आकाश जवळपास निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

 ind vs aus1st odi match weather report mumbai-live-update-hardik-pandya-steve-smith
Shoaib Akhtar : 'माझ्याकडे भारताचे आधार कार्ड आहे', शोएब अख्तरच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारताविरुद्ध वर्चस्व गाजवत आहे. या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि कांगारू तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये यजमान संघाने केवळ एकच सामना जिंकला.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली भारताने वानखेडेवर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्याचवेळी, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाशी शेवटचा सामना झाला होता.

2020 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून पराभव केला होता. अशा परिस्थितीत जेव्हा टीम इंडिया हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल, तेव्हा तो आपला खराब रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल.

 ind vs aus1st odi match weather report mumbai-live-update-hardik-pandya-steve-smith
IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा! हा दिग्गज खेळाडू कर्णधार तर बापुकडेही मोठी जबाबदारी

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.