IND vs AUS : टीम इंडिया Playing-11 मध्ये करणार मोठे बदल! ‘हे’ खेळाडू संघा बाहेर?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठे बदल
India vs Australia Playing-11
India vs Australia Playing-11 sakal
Updated on

India vs Australia Playing-11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज मोहालीत येथे खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे, असे कर्णधार रोहित शर्माने आधीच स्पष्ट केले आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताने भलेही चांगली फलंदाजी केली असेल, पण यावेळी त्यांनी अनेक बदलही केले आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सध्याची टी-20 वर्ल्ड चॅम्पियन टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

India vs Australia Playing-11
Video : किळसवाणं! 200 खेळाडूंना टॉयलेटमध्ये वाढलं जेवण

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिल्या चारमध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. हार्दिक पांड्या त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे निश्चित खेळणार आहे. यष्टिरक्षक म्हणून कोण खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आशिया चषकादरम्यान, कार्तिकने भारताचा पहिला-पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून सुरुवात केली, परंतु अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे रोहितने डावखुरा पंतला संधी दिली. त्यामुळे फिनिशिंग टॅलेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या कार्तिकपेक्षा पंतला प्राधान्य मिळू शकते. जखमी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली. दीपक हुड्डाला आशिया चषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली, पण गोलंदाजीत त्याचा अजिबात उपयोग झाला नाही.

India vs Australia Playing-11
IND vs AUS : टीम इंडिया खेळणार नवीन जर्सीमध्ये, जाणून घ्या 'फ्री' सामना कुठे अन् कधी पाहायचा

दुसरीकडे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्या पुनरागमनामुळे भारताच्या गोलंदाजीला बळ मिळणार आहे. बुमराह आणि हर्षल दोघेही दुखापतींमुळे 2022 च्या आशिया चषकाला मुकले. आता तीन सामन्यांच्या T20I मालिकेदरम्यान ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतील. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या लढतींमध्ये महागडे ठरल्यानंतर भुवनेश्वर कुमारने अफगाणिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. मोहम्मद शमीच्या जागी संघात आलेल्या उमेश यादवलाही टीम इंडिया संधी देऊ शकते. अक्षर व्यतिरिक्त युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विनसारखे फिरकीचे पर्याय आहेत.

  • भारतीय संघ : भारत-रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वरकुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.

  • ऑस्ट्रेलिया : सीन अॅबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हीड, नॅथन इलिस, अॅरोन फिंच (कर्णधार), कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.