IND vs AUS Playing-11: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीला नागपुरात सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळल्या जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत प्लेइंग इलेव्हनबाबत मोठा खुलासा केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचे बरेच काही पणाला लागले आहे. भारताला या वर्षी जूनमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका कोणत्याही किंमतीवर जिंकावी लागेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाही हे रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बऱ्याच अंशी स्पष्ट केले आहे.
रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, 'शुबमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, आणि त्याने अनेक मोठी शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव काय करू शकतो हे आपण पाहिले आहे, परंतु अद्याप या दोघांपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची हे ठरवलेले नाही.
शुभमन गिलने अलीकडेच श्रीलंका आणि न्यूझीलंडसारख्या संघांविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत ज्या प्रकारे कहर केला, त्याचीच पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात झाली तर बॉर्डर गावस्कर मालिकेत भारताचा विजय निश्चित आहे.
नागपुरातील टर्निंग पिचची बरीच चर्चा सुरू आहे. कर्णधार रोहित शर्माने याबाबतचे गुपित उघडले आहे. रोहित शर्मा म्हणाला, 'आमच्याकडे चार दर्जेदार फिरकीपटू आहेत. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी एकत्र भरपूर क्रिकेट खेळले आहे.
अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी जेव्हाही संधी मिळाली तेव्हा चांगली कामगिरी केली आहे. आम्हाला फक्त आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. उद्या दोन्ही देशांचे जे 22 खेळाडू खेळतील ते सर्व उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना चांगले क्रिकेट खेळावे लागेल.
2004 पासून ऑस्ट्रेलियाने भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका तब्बल सहा वर्षानंतर भारतीय भूमीवर खेळवली जात आहे.
2017 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या शेवटच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.