IND Vs AUS 2nd : भारताने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी केला पराभव, मालिका घातली 2 - ० ने खिशात

IND Vs AUS 2nd ODI Live
IND Vs AUS 2nd ODI Live
Updated on

India Vs Australia 2nd ODI : भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या वनडे सामन्यात धावांनी पराभव करत मालिकेत 2 - 0 ने विजयी आघाडी घेतली. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 33 षटकात 317 धावांचे आव्हान आले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी कांगारूंना 217 धावात गुंडाळत सामना 99 धावांनी जिंकला. भारताकडून अश्विनने 3 तर जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. त्यांना प्रसिद्ध कृष्णाने 2 आणि शमीने 1 विकेट घेत चांगली साथ दिली. कांगारूंकडून एबॉटने 54 तर वॉर्नरने 53 धावा केल्या.

162-8 (23 Ov) :जडेजानेही दिले धक्के 

अश्विन पाठोपाठ भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने देखील कांगारूंना धक्के दिले. त्याने एलेक्स कॅरी आणि झाम्पाला बाद केले. तर ग्रीन धावबाद झाला.

101-5 : कांगारूंचा निम्मा संघ गारद 

पाऊस थांबल्यानंतर सामना सुरू झाल्यावर भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने कांगारूंचे तीन फलंदाज टिपले. त्याने सेट झालेल्या वॉर्नरला 53 धावांवर बाद केले. त्यानंतर मार्नसचीही 27 धावांवर शिकार केली. गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या इंग्लिसला देखील 6 धावांवर बाद केले.

33 षटकांचा होणार सामना 

अखेर दीड तासाने पावसाने उसंत दिल्याने सामना पुन्हा सुरू होणार आहे. मात्र सामन्याची षटके कमी केली असून आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 33 षटकात 317 धावांचे आव्हान असणार आहे.

पावसामुळे सामना पुन्हा थांबला. 

56-2 (9 Ov): वॉर्नर - मार्नसने डाव सावरला

ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 षटकात 2 बाद 9 धावा अशी झाली असताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी डाव सावरत संघाला 9 षटाकत 2 बाद 56 धावांपर्यंत पोहचवले. मात्र पावसामुळे सामना पुन्हा थांबला.

9-2 : प्रसिद्धचे कांगारूंना पाठोपाठ दोन धक्के

भारताचे 399 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या कांगारूंना दुसऱ्याच षटकात प्रसिद्ध कृष्णाने दोन धक्के दिले. त्याने षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टला 2 धावांवर तर स्मिथला शुन्यावर बाद केले.

399-5 (50 Ov) : राहुलचे अर्धशतक तर सूर्याचा धमाका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 400 धावांचे आव्हन ठेवले आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या.

IND 289/3 (39) केएलचा आक्रमक अवतार 

भारताचा कर्णधार केएल राहुलने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला 39 षटकात 3 बाद 289 धावांपर्यंत पोहचवले. त्याला इशान किशनने देखील चांगली साथ दिली.

230-2 (33 Ov) : शुभमन गिलचे शतक 

शुभमन गिलने आपले वनडेमधील सहावे शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे यासाठी फक्त त्याने 35 डाव खेळले.

216-2 : श्रेयस अय्यर शतकानंतर लगेच झाला बाद 

श्रेयस अय्यरने दुखापतीतून सावरत दमदार कमबॅक केले. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली. शुभमन गिलसोबत 200 धावांची भागीदारी रचल्यानंतर तो 90 चेंडूत 105 धावा केल्या.

गिलनंतर अय्यरने षटकार मारत ठोकले अर्धशतक

षटकार मारत श्रेयस अय्यरने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली. गिल आणि श्रेयसच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 150 धावांच्या जवळ पोहोचली आहे.

IND Vs AUS 2nd ODI Live : ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, टीम इंडियाच्या शतकानंतर शुभमन गिलचे आणखी एक अर्धशतक

शुभमन गिलने 37 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या 100 धावांच्या पुढे गेली आहे. श्रेयसही अर्धशतकाच्या जवळ असून दोघांमध्ये उत्कृष्ट भागीदारी झाली आहे. या दोघांनाही भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जायला आवडेल. 15 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 117 धावा आहे.

पाऊस थांबला 

पावसाने उसंत घेतली असून खेळ पुन्हा सुरू झाला आहे. भारताने 10 षटकात 1 बाद 80 धावांपर्यंत मजल मारली.

IND Vs AUS 2nd ODI Live : खेळ थांबला! इंदूरमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात, कधी सुरु होणार सामना?

पावसामुळे खेळ थांबवावा लागला आहे. भारताची धावसंख्या 9.5 षटकात 79/1 आहे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत. दोघेही आक्रमक खेळत आहेत. खेळ संपण्यापूर्वीच शुभमन गिलने षटकार ठोकला.

इंदूरच्या सपाट खेळपट्टी आणि छोट्या मैदानावर भारतीय फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे, या मैदानावर टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने एकमेव विकेट घेतली. पाऊस थांबला की थोड्यावेळात सामना सुरू होईल.

शुभमन गिल अन् श्रेयस अय्यरकडून चौकार-षटकार पाऊस!

आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 54 धावा आहे. दोघेही चांगल्या गतीने धावा करत आहेत आणि टीम इंडियाला चांगल्या स्थितीत घेऊन जात आहेत. आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 54 धावा आहे.

श्रेयसने 17 चेंडूत 6 चौकारांसह 32 धावा केल्या.

IND Vs AUS 2nd ODI Live : 4,4,4,4,4,4... मैदानात येताच श्रेयस अय्यरकडून चौकार पाऊस

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने येताच चौकार मारले आहेत. त्याने 14 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या आहेत.

IND Vs AUS 2nd ODI Live : कांगारूने 16 धावांवर टीम इंडियाला दिला मोठा धक्का!

भारताची पहिली विकेट 16 धावांवर पडली. ऋतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला बाद केले. आता श्रेयस अय्यर गिलसोबत क्रीजवर आहे. चार षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 17 धावा आहे.

भारतासाठी चांगली सुरुवात

भारताची फलंदाजी सुरू झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत. ऋतुराजने डावाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली.

IND Vs AUS 2nd ODI Live : जाणून घ्या राहुलने कोणाला दिली संधी

भारत (प्लेइंग इलेव्हन) : शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w/c), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली!

मागील सामन्यात मनगटाच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सला या सामन्यात विश्रांती दिली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा बुमराह या सामन्यात खेळत नसून त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली आहे.

इंदूरमध्ये अद्याप नाही हरलेला भारत

भारताने आतापर्यंत इंदूरच्या होळकर स्टेडियमवर 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. म्हणजे येथे त्याच्या विजयाची टक्केवारी 100 टक्के आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये दुसऱ्यांदा एकदिवसीय सामना होणार आहे. या मैदानावर पहिल्यांदाच दोन्ही संघ एकदिवसीय खेळले तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेटने पराभव केला होता.

India Vs Australia 2nd ODI Live Score : भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या वनडे सामन्यात धावांनी पराभव करत मालिकेत 2 - 0 ने विजयी आघाडी घेतली. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 33 षटकात 317 धावांचे आव्हान आले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी कांगारूंना 217 धावात गुंडाळत सामना 99 धावांनी जिंकला. भारताकडून अश्विनने 3 तर जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. त्यांना प्रसिद्ध कृष्णाने 2 आणि शमीने 1 विकेट घेत चांगली साथ दिली. कांगारूंकडून एबॉटने 54 तर वॉर्नरने 53 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.