Ind vs Aus 2nd ODI: रोहित शर्मा या खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता! दुसऱ्या वनडेत ही असेल Playing-11

Ind vs Aus 2nd ODI Playing-11
Ind vs Aus 2nd ODI Playing-11
Updated on

Ind vs Aus 2nd ODI Playing-11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना उद्या विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून शानदार विजय मिळविला होता.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या वनडेसाठी संघात सामील होणार असल्याने भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे.

रोहित पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणांमुळे खेळू शकला नाही, त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली होती. रोहितच्या पुनरागमनामुळे प्लेइंग-11 मधून कोणता खेळाडू बाहेर पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Ind vs Aus 2nd ODI Playing-11
IND vs AUS : स्वतःच्या राज्याच्या खेळाडूचे अखेर प्रसादने केलं कौतुक, ट्विट करत म्हणाला...

सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशन या दोघांना दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग-11 मधून बाहेर बसावे लागेल असे दिसते. सूर्या बाहेर बसण्याची अधिक शक्यता आहे कारण तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप राहिला आहे. असं असलं तरी इशान किशन मधल्या फळीतही फलंदाजीत माहिर आहे आणि त्याने काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले होते.

Ind vs Aus 2nd ODI Playing-11
IND vs AUS: कर्णधारपद मिळताच हार्दिक पांड्याला आला माज; विराटशी केले गैरवर्तन Video Viral

तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आलं नाही. तो पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कच्या हातून एलबीडब्ल्यू आऊट झाला. तसे सलामीवीर इशान किशनची कामगिरीही निराशाजनक होती. तीन धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर इशानला मार्कस स्टॉइनिसने एलबीडब्ल्यू आऊट केले.

Ind vs Aus 2nd ODI Playing-11
IND vs AUS : रोहितची एन्ट्री होताच दुसऱ्या वनडेतून 'या' दिग्गज खेळाडूचा पत्ता कट

सूर्यकुमार यादवने टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवला आहे, पण 50 षटकांचा फॉरमॅट त्याच्यासाठी काही खास ठरत नाहीये. सूर्याने आतापर्यंत 21 एकदिवसीय सामन्यांच्या 19 डावांमध्ये 27.06 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली. शेवटच्या 10 डावांमध्ये सूर्याला केवळ चार वेळा दुहेरी आकडा गाठता आला.

भारताचे संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.