IND vs AUS 2nd Test Delhi Pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 चा दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही संघ सरावासाठी मैदानावर आले आहेत. दरम्यान खेळपट्टीबाबत वाद पुन्हा निर्माण झाला आहे. त्यांना खेळपट्टीचे फोटो काढू दिले जात नसल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने केला आहे.
बॉर्डर-गावसकर मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी अरुण जेटली स्टेडियममधील क्युरेटर्स ऑस्ट्रेलियन मीडियाला फोटो घेण्यास बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. फॉक्स क्रिकेटच्या वृत्तानुसार, ग्राऊंड स्टाफने ऑस्ट्रेलियन पत्रकारांना खेळपट्टी जवळ जाण्यात थांबवले. त्यानंतर त्यांना सीमारेषा बाहेर केले, तिथूनही फोटो काढू नयेत असे सांगण्यात आले.
याआधी ऑस्ट्रेलियन मीडियाने नागपूरच्या खेळपट्टीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ही खेळपट्टी डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी घातक ठरेल असे त्याने म्हटले होते. ऑस्ट्रेलियामध्ये बहुतांशी डावखुरे फलंदाज असल्यामुळे ही खेळपट्टी तयार करण्यात आली होती. मात्र भारतासाठी अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके झळकावली, हे दोघेही डावखुरे फलंदाज आहेत.
दिल्लीची खेळपट्टी कशी असेल?
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी खूपच चांगला आहे. क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो, या खेळपट्टीवर नेहमीच चांगला टोटल पाहायला मिळतो. छोट्या आणि वेगवान बाऊंड्रीमुळे फलंदाजांना धावा करणे आणखी सोपे झाले आहे. येथेही फिरकीपटूंना चांगली मदत मिळेल. अशा स्थितीत दोन्ही संघांचे फिरकीपटू पहिल्या सामन्याप्रमाणे येथेही वर्चस्व गाजवू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.