IND vs AUS: सिराजचा 'तो' बॉल अन् वॉर्नरला कसोटीतून बाहेर! या दिग्गज खेळाडूची संघात एंट्री

IND vs AUS 2nd Test David Warner Ruled Out
IND vs AUS 2nd Test David Warner Ruled Out
Updated on

IND vs AUS 2nd Test David Warner Ruled Out : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. मोहम्मद सिराजच्या बॅक टू बॅक बाउन्सर बॉलमुळे दुखापत झाल्यानंतर तो आता या कसोटीत मैदानावर खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही. त्याच्या जागी मॅट रेनशॉचा संघात कंकशन सबस्टिट्यूट म्हणून समावेश करण्यात आला आहे.

IND vs AUS 2nd Test David Warner Ruled Out
Prithvi Shaw Selfie Row : सेल्फी घेणे आले अंगलट! सपनाला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

दिल्ली कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरला मोहम्मद सिराजचे काही उसळत्या चेंडू अंगावर खावे लागले. सिराजच्या एका चेंडूने वॉर्नरच्या हाताला दुखापत झाली, तर दुसरा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. मात्र असे असूनही वॉर्नर खेळत राहिला. पण वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्याला दिल्ली टेस्टमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

IND vs AUS 2nd Test David Warner Ruled Out
Smriti Mandhana: RCBची मोठी घोषणा! स्मृती मंधानाकडे सोपवली कर्णधाराची जबाबदारी

या कसोटीच्या पहिल्या डावात 44 चेंडूत 15 धावा करून डेव्हिड वॉर्नर बाद झाला. त्याच्या आणि उस्मान ख्वाजामध्ये पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ 263 धावांवर ऑलआऊट झाला होता. आता दुसऱ्या डावात वॉर्नरऐवजी मॅट रेनशॉ ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळताना दिसणार आहे. मॅट रेनशॉ नागपूर कसोटीत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्या कसोटीच्या दोन्ही डावांत त्याला एकूण 40 धावा करता आल्या. अशा स्थितीत दिल्ली कसोटीत त्याला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.