IND vs AUS 2nd Test Live: राजधानीत टीम इंडियाच किंग; मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी

IND vs AUS 2nd Test Live: राजधानीत टीम इंडियाच किंग; मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी
Updated on

69 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली

Summary

69 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली आहे. विराट कोहली 31 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. भारतीय संघ विजयापासून 46 धावा दूर आहे.

भारताला दुसरा धक्का

भारताला दुसरा मोठा धक्का बसला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा 20 चेंडूत 31 धावा करून धावबाद झाला. पुजारासोबत झालेल्या गैरसमजामुळे त्याला विकेट गमवावी लागली. रोहितने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले.

लंचपर्यंत भारताचा स्कोर 14/1

तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताची धावसंख्या एका विकेटवर 14 धावा आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर आहेत. भारताला विजयासाठी 101 धावांची गरज आहे.

भारताची पहिली विकेट पडली

115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. लोकेश राहुल अवघी एक धाव काढून बाद झाला. नॅथन लिऑनने त्याला यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हाती झेलबाद केले. 2 षटकांनंतर भारताची धावसंख्या 1 विकेटवर 6 धावा आहे.

भारताची फलंदाजी सुरु

115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी सुरू झाली आहे. रोहित शर्मा आणि राहुल ही सलामीची जोडी क्रीझवर आली आहे.

रवींद्र जडेजाचा विकेटचा षटकार

113 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची नववी विकेट पडली. रवींद्र जडेजाने नॅथन लायनला बोल्ड केले. लियॉनने 21 चेंडूत आठ धावा केल्या

ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का!

रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाज अॅलेक्स कॅरीला वैयक्तिक सात धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यासह जडेजाने पाच विकेट पूर्ण केल्या.

जडेजा अन् अश्विनसमोर कांगारूंचे लोटांगण! एक तासात विकेटचा षटकार

ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट पडली आहे. कर्णधार पॅट कमिन्स पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजाने त्याला क्लीन बोल्ड केले. या डावात जडेजाने चार आणि अश्विनने तीन विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

९५ धावांवर ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट पडली आहे. रवींद्र जडेजाने पीटर हँड्सकॉम्बला विराट कोहलीने झेलबाद केले.

जडेजा अन् अश्विनचा कहर! एक तासात ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत

ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 95 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रविचंद्रन अश्विनने मॅट रेनशॉला विकेट्ससमोर पायचीत करत कांगारू संघाला पाचवा धक्का दिला.

ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट पडली 

भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी चांगली सुरुवात केली. पहिल्या सत्रातच अश्विन-जडेजा जोडीने तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यानंतर मार्नस लबुशेन देखील बाहेर केले. रवींद्र जडेजाने त्याला क्लीन बोल्ड करून 95 धावांवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. लबुशेनने 50 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. 22 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 बाद 95 आहे.

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला आहे. रविचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथला आपला शिकार बनवले आहे. 20 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन बाद 90 आहे.

ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पडली

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात रविचंद्रन अश्विनने भारतीय संघाला यश मिळवून दिले. दुसऱ्या डावात 65 धावांच्या स्कोअरवर त्याने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ट्रॅव्हिस हेड 46 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 14 षटकांनंतर 2 बाद 66 अशी आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ दिल्लीत सुरू 

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. ट्रॅव्हिस हेड आणि लबुशेन क्रीजवर आहेत. दोघेही वेगाने धावा करत आहेत आणि भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

India vs Australia 2nd Test Day 3 Live Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने सहा गडी राखून जिंकला आहे. यासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी सुरेख अर्धशतके झळकावली. भारताकडून शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.

प्रत्युत्तरात भारताने खराब सुरुवात करूनही 262 धावा केल्या. अक्षर पटेलने शानदार अर्धशतक झळकावले आणि अश्विनसोबत शतकी भागीदारी केली. विराट कोहलीनेही 44 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 113 धावांत गारद झाला. जडेजाने सात आणि अश्विनने तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय फक्त मार्नस लबुशेन (35) दुहेरी आकडा गाठू शकला. भारतासमोर 115 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने तिसर्‍याच दिवशी चार विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.