IND vs AUS: तिसऱ्या ODI सामन्यासाठी भारताची Playing11 निश्चित! रोहित या खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता

रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये करत आहे मोठा बदल....
India vs Australia 3rd ODI
India vs Australia 3rd ODIsakal
Updated on

India vs Australia 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना बुधवार 22 मार्चला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. मुंबईतील पहिली वनडे भारताने 5 विकेट्सने जिंकली, पण विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

आता बुधवारी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर वनडे मालिकेचा निर्णय होणार आहे. मालिका जिंकण्यासाठी भारतासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमधील 2 खेळाडूंचे पत्ता कट करू शकतो.

India vs Australia 3rd ODI
IPL 2023 : 'धोनीचे शेवटचे वर्ष...' माहीच्या निवृत्तीवर दीपक चहरचा मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंग करेल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी खूपच धोकादायक आहे आणि हे दोन्ही फलंदाज पॉवर-प्लेमध्ये धावा लुटण्यात माहीर आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतके झळकावली आहेत.

India vs Australia 3rd ODI
IND vs AUS : सुर्या भाऊ सलग 2 सामन्यात गोल्डन डक; तिसऱ्या वनडेतून बाहेर?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर विराट कोहलीची बॅट जोरदार फटकेबाजी करणार आहे. कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या आणि निर्णायक वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमधून सूर्यकुमार यादवला वगळू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेत सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही.

तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला संधी देऊ शकतो, जो ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा नाश करू शकतो. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी देऊ शकते.

निर्णायक एकदिवसीय सामन्यात सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू हार्दिक पांड्या असले. सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा आणि आठव्या क्रमांकावर अष्टपैलू अक्षर पटेलला संधी दिल्या जाईल. रोहित प्लेइंग इलेव्हनमधून कुलदीप यादवला वगळू शकतो. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल टीम इंडियाला फिरकी गोलंदाजीसोबत फलंदाजीतही मजबूत करतील. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवची गरज नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाजांपैकी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना संधी देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.