Ind vs Aus 3rd T20 : ग्लेन मॅक्सवेलचे दमदार शतक, शेवटच्या चेंडूवर चौकार मारत जिंकून दिला सामना

Ind vs Aus 3rd T20 : ग्लेन मॅक्सवेलचे दमदार शतक, शेवटच्या चेंडूवर चौकार मारत जिंकून दिला सामना
Updated on

India vs Australia 3rd T20 Live : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताचे 223 धावांचे मोठे आव्हान पार करताना कांगारूंनी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज असताना शतकवीर मॅक्सवेलने चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. यामुळे भारताची मालिका विजयाची संधी पुढे ढकलली गेली. ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत नाबाद 104 धावा ठोकल्या.

151-5 (15.2 Ov) : ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक 

ग्लेन मॅक्सवेलने एकाकी झुंज देत तडाखेबाज अर्धशतक ठोकले. याचबरोबर कांगारूंनी 16 व्या षटकात 150 धावा पार केल्या.

अक्षर पटेलने फोडली जोडी 

अक्षर पटेलने 21 चेंडूत 17 धावा करणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला बाद करत कांगारूंना चौथा धक्का दिला. स्टॉयनिस आणि ग्लेन मॅक्सवेलने चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली होती.

100-3 (9.3 Ov) : भारताने धक्के दिला मात्र कांगारूनीही दिले तडाखे

भारताचे 224 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कांगारूंनी आक्रमक फलंदाजी केली. भारताचे जरी पहिल्या 10 षटकात कांगारूंना तीन धक्के दिले असले तरी त्यांनी शतकी मजल मारून भारताचं टेन्शन वाढवलं.

गुवाहाटीमध्ये ऋतु'राज'! भारताने ऑस्ट्रेलियाला दिले 223 धावांचे लक्ष्य

भारताने ऑस्ट्रेलियाला 223 धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 222 धावा केल्या.

ऋतुराज गायकवाडने 57 चेंडूत 123 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय तिलक वर्माने 24 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 59 चेंडूत 141 धावांची नाबाद भागीदारी झाली.

ऑस्ट्रेलियाने 20 व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला दिले. 20 वे षटक मॅक्‍सवेलचे पहिले षटक होते आणि या षटकात ऋतुराजने तीन षटकार आणि एक चौकार मारला. भारताने 20व्या षटकात 30 धावा केल्या. टीम इंडियाने शेवटच्या पाच षटकात 79 धावा केल्या. मालिकेत पुनरागमन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 223 धावा कराव्या लागतील.

ऋतुराज गायकवाडने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ठोकले पहिले शतक

ऋतुराज गायकवाडने ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर षटकार खेचून आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

टीम इंडिया 100 पार...! गायकवाड-तिलकने संभाळला मोर्चा

भारताने 12 षटकात 3 विकेट गमावत 100 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाडने मोर्चा संभाळला आहे.

 तीन षटकांत भारताला दुसरा धक्का!  

तिसऱ्या षटकात 24 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. केन रिचर्डसनने इशान किशनला झेलबाद केले. पाच चेंडू खेळणाऱ्या इशानला खातेही उघडता आले नाही. तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा आहे.

दुसऱ्याच षटकात भारताला मोठा धक्का! यशस्वी पॅव्हेलियनमध्ये

डावाच्या दुसऱ्याच षटकात १४ धावांवर भारताला मोठा धक्का बसला. जेसन बेहरेनडॉर्फचा चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक मॅथ्यू वेडकडे गेला, आणि तो आऊट झाला. दोन षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 18 धावा आहे.

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली! घेतला 'हा' निर्णय

तिसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग-11 मध्ये तीन बदल केले आहेत.

मॅथ्यू शॉर्टच्या जागी ट्रॅव्हिस हेडचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी शॉन अॅबॉटच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फ खेळत आहे आणि अॅडम झाम्पाच्या जागी केोन रिचर्डसन खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.