Ind vs Aus : पहिल्यांदाच 'या' मैदानावर खेळल्या जाणार टी-20 आंतरराष्ट्रीय सामना! जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी

India vs Australia 4th T20
India vs Australia 4th T20
Updated on

India vs Australia 4th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-20 सामना 1 डिसेंबरला रायपूरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ आधीच 2-1 ने पुढे आहे. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे.

चौथ्या सामन्यासाठी श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या संघात परतणार आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियममध्ये अद्याप एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. येथे पहिल्यांदाच टी-20 सामना आयोजित केला जाणार आहे. इथली खेळपट्टी कशी असेल जाणून घेऊया...

India vs Australia 4th T20
IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आगरकरची मोठी खेळी! एक... दोन... नाही तर इतके संघ केले रेडी

रायपूरच्या मैदानावर आतापर्यंत फक्त एक वनडे सामना खेळला गेला आहे. त्या सामन्यात भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा संघ 108 धावांत ऑलआऊट झाला होता. यानंतर टीम इंडियाने 2 विकेट्स राखून हे लक्ष्य सहज गाठले. या मैदानावर आयपीएल आणि चॅम्पियन्स टी-20 लीगचे अनेक सामने खेळले गेले आहेत.

कशी असेल खेळपट्टी

रायपूरच्या मैदानावर 6 आयपीएल सामने आणि 8 चॅम्पियन्स टी20 लीग सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये फक्त एकदाच असे घडले आहे की एखाद्या संघाने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल, अशी पूर्ण आशा आहे.

दुसऱ्या डावात ही खेळपट्टी संथ होते, त्यामुळे या खेळपट्टीवरून फिरकीपटूंना मदत मिळते. पण पाठलाग करणार्‍या संघाला थोडे सोपे होऊ शकते, कारण नंतर दव येते आणि गोलंदाजी करणे कठीण होते. त्यामुळे नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची ठरते.

India vs Australia 4th T20
Ind vs Sa : रोहित, पांड्या नाही तर 'हा' खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सांभाळणार टीम इंडियाचा पदभार

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर चौथ्या टी-20 सामन्यातून टीम इंडियात परतणार आहे. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :

ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आर. प्रसीध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, दीपक चहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.