Ind vs Aus : पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल, 'या' खेळाडूचा चौथ्या टी-20 सामन्यातून पत्ता कट?

ind vs aus 4th t20i match shreyas iyer return
ind vs aus 4th t20i match shreyas iyer returnsakal
Updated on

IND vs AUS 4 T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना उद्या संध्याकाळी 7:00 वाजता रायपूर येथे खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत अजूनही 2-1 ने आघाडीवर आहे.

टीम इंडियाने चौथा टी-20 सामना जिंकल्यास पाच सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला जाईल. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकून वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

टीम इंडिया स्टार फलंदाज श्रेयस अय्यर चौथ्या टी-20 सामन्यात पुनरागमन करणार आहे. पुनरागमन करताच प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

ind vs aus 4th t20i match shreyas iyer return
Wasim Akram : मला माफ करा मात्र तुम्हाला तुमची चूक... वसिम अक्रमने भारताच्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार?

भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांनी आतापर्यंतच्या तिन्ही टी-20 सामन्यांमध्ये भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. गायकवाडने तिसऱ्या टी-20 सामन्यात शतक झळकावले, आणि 123 धावांची खेळी खेळली. तर जैस्वालने चांगली फलंदाजी केली आहे. श्रेयस अय्यर संघात परतल्यानंतर तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो.

ind vs aus 4th t20i match shreyas iyer return
IPL 2024 Auction : लिलावासाठी नोंदणी करण्याची आज शेवटची तारीख; कमिन्स, हेडवर असणार सर्वाधिक लक्ष

इशान किशनने पहिल्या दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली होती, मात्र त्याला आतापर्यंत यष्टीरक्षणात चांगली कामगिरी करता आलेली नाही. तिसऱ्या टी-20मध्ये खराब यष्टिरक्षणामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत चौथ्या टी-20 सामन्यात जितेश शर्माला त्याच्या जागी संधी मिळू शकते. जितेशने आशियाई खेळ 2023 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले. रिंकू सिंगला सहाव्या क्रमांकावर स्थान मिळू शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत प्रसिद्ध कृष्णा चांगलाच महागात पडला आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये त्याने चार षटकात 68 धावा दिल्या. अशा परिस्थितीत मुकेश कुमारच्या जागी समाविष्ट करण्यात आलेल्या दीपक चहरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांना त्याला साथ देण्याची संधी मिळू शकते. फिरकी विभागाची जबाबदारी अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांच्याकडे सोपवली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.