IND vs AUS: मोठा प्लेयर मोठी खेळी! विराट कोहलीचे द्विशतक हुकले मात्र टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर

 IND vs AUS 4th Test Day 4 Virat Kohli
IND vs AUS 4th Test Day 4 Virat Kohli
Updated on

IND vs AUS 4th Test Day 4 Virat Kohli : मोठा प्लेयर मोठी खेळी! विराट कोहलीने अहमदाबाद कसोटी संस्मरणीय बनवली. कसोटी क्रिकेटमधील शतकाची साडेतीन वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवण्याबरोबरच कोहलीने टीम इंडियाला मजबूत धावसंख्येपर्यंत आणले आहे.

मात्र विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या द्विशतक हुकले. सतत पडणाऱ्या विकेट्समुळे कोहलीने शेवटी वेगवान फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात तो बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला. तरीही त्याने 186 धावांची जबरदस्त इनिंग खेळून पुनरागमनाची घोषणा केली.

 IND vs AUS 4th Test Day 4 Virat Kohli
Virat Kohli: विराटला करौली बाबा पावले; कसोटीत तीन वर्षानंतर विराटनं ठोकलं शतकं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना खेळल्या जात आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी कोहलीने पहिल्या कसोटी शतकाची प्रतीक्षा संपवली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे आठवे शतक तर कसोटी क्रिकेटमधील 28वे शतक पूर्ण केले.

 IND vs AUS 4th Test Day 4 Virat Kohli
IND vs AUS Virat Kohli : विराटच्या 75व्या आंतरराष्ट्रीय शतकाने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

आतापर्यंतच्या सामन्यात काय घडलं?

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजाच्या 180 आणि कॅमेरून ग्रीनच्या 114 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात भारताने शुभमन गिलच्या 128, विराट कोहलीच्या 186 आणि अक्षर पटेलच्या 79 धावांच्या जोरावर 571 धावा केल्या. नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 91 धावांची आघाडी मिळाली. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे पहिल्या डावात फलंदाजीला आला नाही.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता तीन धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.