IND vs AUS 4th Test Live Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या दिवशी 4 बाद 255 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसावर आपले वर्चस्व राखले. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने अँकर इनिंग खेळत नाबाद शतकी खेळी केली. त्याला कॅमेरून ग्रीनने नाबाद 49 धावांची आक्रमक खेळी करत चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ग्रीन 49 धावा करून तर उस्मान ख्वाजा 104 धावा करून नाबाद होते. भारताकडून पहिल्या दिवशी मोहम्मद शमीने 2 तर आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताने चहापानानंतर कांगारूंना स्टीव्ह स्मिथ आणि हँडस्कोम्ब यांना स्वस्तात बाद केले होते. मात्र त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांनी पाचव्या विकेटसाठी दमदार अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 250 च्या जवळ पोहचवले. ग्रीनने नवीन चेंडूवर आक्रमक फलंदाजी केली. तर ख्वाजाची अँकर इनिंग शतकाजवळ पोहचली.
मोहम्मद शमीने पिटर हँड्सकोम्बला 17 धावांवर बाद करत कांगारूंना चौथा धक्का दिला.
टी ब्रेकनंतर कांगारूंला मोठा धक्का बसला आहे. 151 धावांवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली. रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्मिथने 135 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. स्मिथने ख्वाजासोबत 79 धावांची भागीदारी केली.
अहमदाबाद कसोटीत पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने दोन गड्यांच्या मोबदल्यात 150 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा ही जोडी सध्या क्रीजवर आहे. दोघांमध्ये उत्कृष्ट भागीदारी झाली असून ऑस्ट्रेलियन संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.
दुसऱ्या सत्राचा खेळ पहिल्या दिवशी संपला. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 149/2 आहे. स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांच्या नजरा क्रीजवर आहेत आणि ते शानदार फलंदाजी करत आहेत. या दोघांनीही संथ फलंदाजी केली असली तरी दुसऱ्या सत्रात भारताला एकही बळी मिळवून दिला नाही. या दोघांसमोर भारतीय गोलंदाज निष्प्रभ दिसत आहेत.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आणि ट्रॅव्हिस हेडने ख्वाजासोबत पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. रविचंद्रन अश्विनने हेडला बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. हेडने 44 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 32 धावांची खेळी खेळली. यानंतर मोहम्मद शमीने कसोटी क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा फलंदाज मार्नस लबुशेनला (३१) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
अहमदाबाद कसोटीत उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथची जोडी मजबूत झाली आहे. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 70 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. स्मिथचीही अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे. ही जोडी फोडण्यासाठी कर्णधाराने चेंडू श्रेयस अय्यरकडे सोपवला.
उस्मान ख्वाजाने 146 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंतच्या खेळीत नऊ चौकार मारले आहेत. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. याआधी त्याने ट्रॅव्हिस हेडसोबतही अर्धशतकी भागीदारी केली होती. ख्वाजाचे हे कसोटी क्रिकेटमधील 22 वे अर्धशतक आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन गडी गमावून 130 धावांच्या पुढे गेली आहे.
अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहारानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या 100 धावा पूर्ण केल्या आहेत. उस्मान ख्वाजा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ क्रीजवर आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने दोन गडी बाद 80 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा क्रीजवर आहेत. दो
पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 75/2 आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ दोन आणि उस्मान ख्वाजा 27 धावा करत खेळत आहे.
भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
ट्रेविट हेड 32 धावा करून अश्विनच्या चेंडूवर जडेजाने झेलबाद झाला. यानंतर शमीने तीन धावांच्या स्कोअरवर मार्नस लबुशेनला बोल्ड केले.
72 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला आहे. मार्नस लबुशेनला शमीने बोल्ड केले. मार्नस चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु शमीकडून एक इनसाइड बॉल खेळण्यात चूक झाली आणि चेंडू त्याच्या बॅटचा कट घेत स्टंपवर जाऊन आदळला.
अश्विनने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला आहे. धोकादायक ट्रॅव्हिस हेड 44 चेंडूत 32 धावा करून आऊट झाला. ऑस्ट्रेलिया संघाची पहिली विकेट 61 धावांवर पडली. 17 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर 62 अशी आहे.
शेवटच्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या विकेटसाठी उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली केली आहे. 6 षटके खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 23 धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा ही सलामीची जोडी क्रीझवर आहे.
भारत : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनमन, नॅथन लियॉन.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचा सामना जिंकणाऱ्या कांगारू संघाने कोणताही बदल केला नाही. त्याचबरोबर भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली असून मोहम्मद शमीचे टीम इंडियात पुनरागमन करत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज पहिल्या दिवसाचा खेळ पाहणार आहेत. सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या क्रिकेट संघाच्या कर्णधाराचा गौरव केला आणि विशिष्ट कसोटी सामन्यासाठी त्याला खास कॅप दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज स्टेडियममध्ये उपस्थित आहे. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी त्यांचे स्वागत केले. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, बीसीसीआय सचिव जय शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही स्टेडियममध्ये उपस्थित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.