IND vs AUS: T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात पावसाचा धोका? जाणून घ्या हवामान अंदाज

Ind vs Aus 5th T20i Bengaluru Weather Report
Ind vs Aus 5th T20i Bengaluru Weather Reportsakal
Updated on

Ind vs Aus 5th T20i Bengaluru Weather Report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली असून 3-1 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान बंगळुरूचे हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.

Ind vs Aus 5th T20i Bengaluru Weather Report
IPL 2024 : ठाकुर बहुत नाइंसाफी...जागा 77... खेळाडू 1166...! पहा लिलावात कोणत्या खेळाडूंची किती आहे 'बेस प्राईज'

पाचव्या टी-20 सामन्यावर पावसाचा धोका?

सामन्यादरम्यान, बेंगळुरूचे आकाश पूर्णपणे ढगांनी झाकलेले असेल आणि हवामानात 83% आर्द्रता असेल. मात्र पावसाची शक्यता केवळ तीन टक्के आहे. त्याच वेळी, बेंगळुरूमध्ये तापमान 18 ते 22 अंशांच्या दरम्यान राहील. त्याचबरोबर रात्रीच्या वेळीही दव दिसू शकते. अशा परिस्थितीत आज क्रिकेट चाहत्यांना संपूर्ण सामना बघायला मिळेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

Ind vs Aus 5th T20i Bengaluru Weather Report
Schoolympics 2023 : स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेत आरएमडी, ब्लू रिज, ऑर्किडची घोडदौड

हा सामना फ्री कसा पाहायचा?

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका स्पोर्ट्स-18 आणि कलर्स सिनेप्लेक्सवर प्रसारित होत आहे. त्याच वेळी, डीडी फ्री डिश वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर सामना विनामूल्य पाहू शकतात. त्याच वेळी, तुम्ही या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema अॅपवर पाहू शकता, जे पूर्णपणे विनामूल्य आहे.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आर. प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, दीपर चहर.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :

मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.