Ind vs Aus Final : जन गण मन...! दीड लाख लोकांनी एकाच वेळी गायले राष्ट्रगीत, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

ind vs aus final 2023 one lakh 30 thousand indian fans sing national anthem
ind vs aus final 2023 one lakh 30 thousand indian fans sing national anthem
Updated on

Ind vs Aus Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी देशभक्तीच्या भावना शिगेला पोहोचल्या होत्या. दोन्ही देशांचे खेळाडू आपल्या देशाला विश्वविजेते बनवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले होते आणि या ऐतिहासिक सामन्याचा भाग होण्यासाठी भावूक झाले होते. त्याचवेळी भारतीय संघ तब्बल 12 वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. अशा स्थितीत भारतीय चाहतेही चांगलेच उत्साहात होते.

ind vs aus final 2023 one lakh 30 thousand indian fans sing national anthem
Ind vs Aus Final : पॅलेस्टिनचा समर्थक घुसला मैदानात अन् सामना थांबला; फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने...

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता 1.30 लाख प्रेक्षकांची आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले होते. बहुतेक प्रेक्षक भारतातील होते. सामन्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा लोक पूर्ण उत्साहाने राष्ट्रगीत गात होते. स्टेडियममध्ये ज्या प्रकारे जन गण मनाचा आवाज घुमत होता. ते दृश्य ऐतिहासिक होते. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना आधीच ऐतिहासिक होता. कारण, भारतीय संघाने सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आणि सर्व संघांचा एकतर्फी पराभव केला. मात्र, जेव्हा 1.30 लाख लोकांनी स्टेडियममध्ये एकत्र राष्ट्रगीत गायले, तेव्हा हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी ऐतिहासिक ठरला.

अनेक दिग्गज व्यक्ती स्टेडियममध्ये उपस्थित होत्या आणि हा क्षण त्या सर्वांसाठी ऐतिहासिक ठरला. स्टेडियममध्ये उपस्थित असलेला कोणताही भारतीय त्याच्या आयुष्यातला हा क्षण विसरू शकणार नाही.

भारतीय संघ चौथ्यांदा एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी भारताने 1983, 2003 आणि 2011 मध्ये वर्ल्ड कप फायनल खेळली आहे. टीम इंडिया 1983 आणि 2011 मध्ये चॅम्पियन बनली होती, मात्र 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.