सप्टेंबर महिन्यात झालेली आशिया करंडक स्पर्धा ही द्रविड - रोहित जोडीसाठी निर्णायक होती. या स्पर्धेत भारतीय संघाने उत्तम खेळ करून विजेतेपद पटकावले.
IND vs AUS ICC World Cup 2023 Final : नोव्हेंबर २०२१ मध्ये राहुल द्रविडने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. नंतर एकाच महिन्यात रोहित शर्माकडे (Rohit Sharma) एक दिवसीय संघाचे नेतृत्व आले. कालांतराने कसोटी, एक दिवसीय आणि ‘टी-२०’ सगळ्याच संघाचा रोहित कर्णधार झाला.
थोडक्यात दोन वर्ष रोहित शर्मा- राहुल द्रविडची (Rahul Dravid) जोडी एकत्र काम करत आहे. दोघांचे स्वभाव शांत. फरक असा आहे की रोहित मूळचा हसरा माणूस आणि द्रविड काहीसा गंभीर. दोघांच्या फलंदाजीच्या शैलीत खूप फरक आहे. द्रविड अत्यंत भक्कम बचावानंतर तंत्रशुद्ध फटके मारणारा फलंदाज. रोहित शर्मा कमालीचा आक्रमक.
साहजिकच एकत्र काम सुरू केल्यावर दोघांच्या कुंडलीतील ग्रह तारे जुळायला वेळ लागला. आजच्या अंतिम सामन्याप्रमाणेच २४ ऑक्टोबर २०२१ चा दिवस भारतीय संघासाठी दुःखद आठवणी निर्माण करणारा ठरला होता. तेव्हा भारतीय संघ ‘टी-२०’ विश्वकरंडक सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १० विकेटनी पराभूत झाला. बाकी कोणा संघाविरुद्ध खेळताना भारतीय संघ पराभूत झाला तर भारतीय क्रिकेट चाहते कदाचित मोठ्या मनाने माफ करतील, पण पाकिस्तानसमोरचा पराभव नामंजूर असतो.
त्यातून पराभव दहा विकेटने झालेला. मग काय प्रशिक्षक आणि कर्णधारावर टीकेचा भडिमार झाला. त्या पराभवानंतर रोहित शर्मा पत्रकार परिषदेला आला तेव्हा त्याने पत्रकारांनी नाराजीचा सूर काढत विचारलेल्या तिरक्या प्रश्नांना शांतपणे उत्तरे दिली. ‘‘संघातील वातावरण खेळीमेळीचे हलके फुलके ठेवायला खूप विचारपूर्वक मेहनत घेतली जात आहे. खेळाडूंना दडपण मागे ठेवून मनमोकळा खेळ त्यांच्या शैलीत करायला मी प्रोत्साहन देतो आहे.
हा पराभव आम्ही लक्षात ठेवू पण अनावश्यक त्रास करून घेणार नाही. आम्हाला पूर्ण खात्री आहे की जी कार्यपद्धती चालू केली आहे, त्याचे चांगले परिणाम दिसतील,’’ रोहित म्हणाला होता. त्यानंतर राहुल द्रविड संघाला मार्गदर्शन करू लागल्यावर भारतीय संघाने मायदेशात आलेल्या प्रत्येक संघाला मोठ्या पराभवांची धूळ चारली.
ऑस्ट्रेलियात झालेल्या ‘टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेत राहुल द्रविड - रोहित शर्मा जोडीने ठसा उमटवत उपांत्य फेरीत मजल मारली. उपांत्य सामन्यात परत तेच झाले. भारतीय संघाने उभारलेली अर्धवट धावसंख्या इंग्लंडने अगदी एकही विकेट न गमावता पार केली. त्या सामन्यानंतर रोहितने अत्यंत विचारपूर्वक बदल करायचा निश्चय केला.
‘‘एक दिवसीय सामना असो वा ‘टी-२०’ सामना, भारतीय संघाला यश मिळवायचे झाले तर भीती बाळगून किंवा सतत काय निकाल लागेल याचा विचार करत खेळून चालणार नाही. आपल्याला बिनधास्त, बेधडक आक्रमक क्रिकेट खेळावे लागेल. खेळाडूंना मनमोकळेपणाने खेळू दिले पाहिजे. त्यांना तसे करताना काही सामन्यात अपयश आले, तरी दोष देता कामा नये.
एकदा का खेळाडूला पूर्ण तपासून निवडले गेले की कोणाही खेळाडूला संघातील आपली जागा डळमळीत आहे, असे वाटता कामा नये,’’ रोहितने आक्रमक भूमिका मांडली होती. चांगली गोष्ट ही की राहुल द्रविडने ती भूमिका मान्य करून रोहितला संपूर्ण साथ दिली. तसेच त्या दृष्टीने प्रशिक्षणात बदल केले. सध्या दिसणारे सगळे परिणाम त्या बदलांचे आहेत.
सप्टेंबर महिन्यात झालेली आशिया करंडक स्पर्धा ही द्रविड - रोहित जोडीसाठी निर्णायक होती. या स्पर्धेत भारतीय संघाने उत्तम खेळ करून विजेतेपद पटकावले. त्यानंतर आपल्याला एक दिवसीय विश्वकरंडकात रोहित शर्मा-राहुल द्रविडची ‘रोरा’वणारी जोडी दिसली आहे.
के. एल. राहुल
विरुद्ध ऑस्ट्रेलिया
९७
रोहित शर्मा
विरुद्ध अफगाणिस्तान
१३१
रोहित शर्मा
विरुद्ध पाकिस्तान
८६
विराट कोहली
विरुद्ध बांगलादेश
१०३*
विराट कोहली
विरुद्ध न्यूझीलंड
९५
के. एल. राहुल
विरुद्ध ऑस्ट्रेलिया
(अंतिम सामना)
६६
रोहित शर्मा
विरुद्ध इंग्लंड
८७
शुभमन गिल
विरुद्ध श्रीलंका
९२
विराट कोहली
विरुद्ध द. आफ्रिका
१०१*
श्रेयस अय्यर
विरुद्ध नेदरलँड्स
१२८*
विराट कोहली
विरुद्ध न्यूझीलंड
११७*
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.