IND vs AUS : कसोटी मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का! ODI मालिकेतून कर्णधार बाहेर

Team India News: भारताविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर एकदिवसीय मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे.
IND vs AUS ODI series Pat Cummins set to miss ODI series against India Steve Smith to retain captaincy cricket news in marathi kgm00
IND vs AUS ODI series Pat Cummins set to miss ODI series against India Steve Smith to retain captaincy cricket news in marathi kgm00
Updated on

IND vs AUS ODI Series : भारताविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर एकदिवसीय मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आता भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. तो एकदिवसीय मालिकेसाठी भारतात परतणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले.

IND vs AUS ODI series Pat Cummins set to miss ODI series against India Steve Smith to retain captaincy cricket news in marathi kgm00
IND vs AUS: कोचने जडेजाला अन् अक्षरला WTC फायनलमधून वगळले, 3 महिने आधीच सांगितली प्लेइंग-11

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेत स्टीव्ह स्मिथ कांगारू संघाचे नेतृत्वही करणार आहे. पॅट कमिन्स या मालिकेसाठी उपलब्ध होणार नाही.

त्याचवेळी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अष्टपैलू अॅश्टन अगर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही खेळाडू कसोटी संघाचा भाग होते, पण नंतर वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेत स्टीव्ह स्मिथ कांगारू संघाचे नेतृत्वही करणार आहे. पॅट कमिन्स या मालिकेसाठी उपस्थित राहू शकणार नाही. त्याचवेळी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अष्टपैलू अॅश्टन अगर यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

हे दोन्ही खेळाडू कसोटी संघाचा भाग होते, पण नंतर वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आले. पॅट कमिन्सनेही कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर कमिन्सच्या आईची प्रकृती खालावली आणि ते घरी परतले.

कमिन्स गेल्यानंतर स्टीव्ह स्मिथने संघाची धुरा सांभाळली आणि इंदौरमधील कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाला. अहमदाबादमधील पुढील सामना अनिर्णित राहिला आणि कांगारूंनी मालिका 2-1 ने गमावली. एकदिवसीय मालिकेतही स्टीव्ह स्मिथ कांगारू संघाचे नेतृत्व करेल.

ऑस्ट्रेलिया वनडे टीम
डेविड वार्नर, ट्रैविस हेड, स्टीवन स्मिथ, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी, ग्लेन मैक्सवेल, कैमरून ग्रीन, जोश इंगलिस, सीन एबॉट, एश्टन एगर, मिशेल स्टार्क, नाथन एलिस, एडम जम्पा।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.