Ind Vs Aus: ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' दिग्गज खेळाडूंना मिळणार विश्रांती?

team india squad for the asian games
team india squad for the asian gamessakal

Team India Squad For The Australia : वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाने आशिया कप जिंकला आहे, पण अजून एक कसोटी बाकी आहे. एकदिवसीय वर्ल्डकपपूर्वी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. जी 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर रात्री 8.30 वाजता पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करणार आहेत.

team india squad for the asian games
ICC World Cup 2023 : वर्ल्डकपच्या तोंडावर संघात अचानक मोठा बदल, स्फोटक फलंदाजाला वगळलं अन्...

वर्ल्डकपपूर्वी होणाऱ्या या मालिकेत काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती मिळू शकते, तर काही नवीन खेळाडूंना संधी मिळू शकते. ही मालिका देखील खास बनते कारण ती मायदेशात होणार आहे आणि भारताला ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. याशिवाय 28 सप्टेंबरपर्यंत वर्ल्डकप संघात बदल केले जाऊ शकतात, अशा परिस्थितीत टीम इंडियाला कोणताही प्रयोग करायचा असेल तर ही शेवटची संधी आहे.

team india squad for the asian games
Team India Schedule : मोहीम आशिया कप 2023 फत्ते! पुढे काय?, जाणून घ्या टीम इंडियाचे शेड्यूल

या मालिकेत टीम इंडिया काही खेळाडूंना विश्रांती देणार की नाही हा प्रश्न आहे, कारण यानंतर वर्ल्डकप आहे आणि दीड महिन्यात जवळपास डझनभर सामने खेळावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या किंवा इतर काही खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

काही रिपोर्ट्समध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मालाही विश्रांती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे, मात्र ऑस्ट्रेलियासारख्या महत्त्वाच्या संघासमोर या दिग्गज खेळाडूंना विश्रांती घेणं हा निर्णय चूकचा ठरू शकतो, कारण ऑस्ट्रेलियानेही आपला मजबूत संघ इथे पाठवला आहे.

भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी, शॉन एब, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, अॅडम झाम्पा.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक:

  • 22 सप्टेंबर – पहिली वनडे (मोहाली)

  • 24 सप्टेंबर – दुसरी वनडे (इंदूर)

  • 27 सप्टेंबर – तिसरी एकदिवसीय (राजकोट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com