IND vs AUS: केएल राहुलसाठी सूर्याचा बळी; फक्त एकच कसोटी खेळल्यावर होणार गच्छंती?

केएल राहुलचा फॉर्म गेल्या काही दिवसांपासून खराब पण तो खेळणार
ind vs aus playing 11 suryakumar yadav
ind vs aus playing 11 suryakumar yadav
Updated on

India vs Australia Test Series Playing-11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून दिल्लीत खेळल्या जाणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. आता भारतीय संघाची नजर दुसरी कसोटी जिंकून मालिकेत अजिंक्य आघाडी मिळविण्यावर असेल. दिल्ली कसोटीत प्लेइंग-11 मध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात.

ind vs aus playing 11 suryakumar yadav
IND vs AUS 2nd Test : फिरकी मास्टर टीम इंडियासाठी कांगारूंनी वापरले धक्कातंत्र! धडकी भरवणारा गोलंदाज परतला

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर तंदुरुस्त झाला असून प्लेइंग-11 मध्ये त्याचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, श्रेयस जर पाच दिवस भार सहन करणार असेल तर तो पुनरागमन करू शकेल. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर श्रेयसचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेशमधील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान त्याला पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली होती. अय्यर परतले तर सूर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागेल.

ind vs aus playing 11 suryakumar yadav
Chetan Sharma Controversy : एवढं होऊनही बीसीसीआय चेतन शर्मांना देणार शेवटची संधी

सूर्यकुमार यादवने नागपुरात पदार्पण केले आहे. पहिल्या डावात त्याने आठ धावा केल्या. अय्यर खेळत नसताना त्याला संधी मिळाली. कसोटी सामन्यांमध्ये श्रेयसचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने सात सामन्यांत 56.73 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. यादरम्यान अय्यरने एक शतक तर पाच अर्धशतकेही झळकावले आहेत. अशा स्थितीत अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यास सूर्यकुमार यादव बाहेर बसणार हे निश्चित आहे.

ind vs aus playing 11 suryakumar yadav
Pujara 100th Test : शाहरूखने मदत केली नसती तर, 14 वर्षांपूर्वी संपलं असतं चेतेश्वरचं करिअर

सलामीवीर फलंदाज केएल राहुलचा फॉर्म गेल्या काही दिवसांपासून खराब आहे. यामुळे त्याला टी-20 मधील स्थान गमवावे लागले. त्याचवेळी त्याला वनडेमधील उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत राहुलला केवळ 20 धावा करता आल्या होत्या. कसोटीच्या शेवटच्या आठ डावांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. राहुलला डिसेंबर 2021 पासून कसोटीत शतक झळकावता आलेले नाही. त्याने शेवटचे शतकही दक्षिण आफ्रिकेतच झळकावले होते. राहुलला दिल्ली कसोटीत खेळण्याची संधी मिळाली तर त्याला मोठी खेळी खेळावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.