IND vs AUS T20 : सूर्यकुमारच्या विश्‍वासामुळे यश; अखेरच्या षटकातील यशानंतर अर्शदीपची कबुली

संघ व्यवस्थापन व कर्णधार सूर्यकुमार यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला.
ind vs aus t20 cricket match winning arshdeep singh says about suryakumar yadav
ind vs aus t20 cricket match winning arshdeep singh says about suryakumar yadav Sakal
Updated on

बंगळूर : ऑस्ट्रेलियासमोर अखेरच्या टी-२० लढतीत विजयासाठी १० धावांचे आव्हान होते. याप्रसंगी हे षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंगच्या हाती चेंडू सोपवण्यात आला. पहिल्या तीन षटकांमध्ये ३७ धावांची लूट करणाऱ्या अर्शदीपने या षटकात अवघ्या तीन धावा दिल्या आणि भारताला सहा धावांनी विजय मिळवून दिला.

याच पार्श्वभूमीवर अर्शदीप याच्याकडून कर्णधार सूर्यकुमार यादव व संघ व्यवस्थापनाने दाखवलेल्या विश्‍वासामुळे यश संपादन करता आल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

अर्शदीप पुढे म्हणाला, माझ्या गोलंदाजीवर मोठ्या प्रमाणात धावा प्रतिस्पर्ध्यांना मिळाल्या, पण देवाच्या कृपेने चमक दाखवण्याची आणखी संधी मिळाली. संघ व्यवस्थापन व कर्णधार सूर्यकुमार यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला.

ind vs aus t20 cricket match winning arshdeep singh says about suryakumar yadav
IND vs AUS: T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात पावसाचा धोका? जाणून घ्या हवामान अंदाज

सूर्यकुमारने मला सांगितले की, जे होईल ते होऊदे. तू तुझी कामगिरी कर, असा सल्ला त्याच्याकडून देण्यात आला. गेल्या काही काळामध्ये खूप काही शिकायला मिळाले. चुकांमधून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.

वॉशिंग्टन सुंदर असता तर...

बंगळूरमधील पाचव्या लढतीत भारताने मिळवलेल्या विजयात अक्षर पटेल व रवी बिश्‍नोई हे फिरकी गोलंदाज चमकले. या लढतीसाठी भारतीय संघात एखादा जादा फिरकीपटू असता तर भारतीय संघ अधिक सहज जिंकला असता, असे कर्णधार सूर्यकुमार यादव याला वाटते.

ind vs aus t20 cricket match winning arshdeep singh says about suryakumar yadav
T20 World Cup 2024 : 'या' आयोजक देशाने घेतली माघार; वर्ल्डकपला अवघे काही महिने राहिले असताना ICC ला बसला धक्का

तो या वेळी म्हणाला, अक्षर पटेल, रवी बिश्‍नोई या दोन फिरकीपटूंसह वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूचा समावेश संघात असता तर भारतीय संघाला आणखी मोठा विजय मिळवता आला असता.

माझ्या गोलंदाजीवर जास्त धावा काढण्यात आल्या होत्या. अखेरच्या षटकात माझ्याकडे चेंडू दिल्यानंतर भारतीय संघ पराभूत होऊ नये असे मनोमनी वाटत होते. सूर्यकुमार यादवचा विश्‍वास माझ्यासोबत होता. मॅथ्यू वेडला सुरुवातीला बाऊन्सर टाकून त्याच्या मनामध्ये संशय निर्माण केला. त्यानंतर तो बाद झाल्यानंतर विजयाची हमी मिळाली.

- अर्शदीप सिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()