Ind vs Aus T20 World Cup : रोहित खेळतो तेव्हा आम्ही केवळ पाहत राहतो; अर्शदीप सिंग

Rohit Sharma Batting : रोहित अशी बॅटींग करतो तेव्हा त्याला चेंडू मारावा लागत नाही. तो फक्त योग्य टायमिंग साधतो आणि मग चेंडू लांब लांब जाऊन पडतो.
Rohit Sharma Batting
Rohit Sharma Batting Sakal
Updated on

जॉर्जटाऊन : कप्तान रोहित शर्मा जेव्हा त्याच्या लयीत खेळतो, तेव्हा आम्ही त्याचा खूप आनंद घेतो आणि डोळे लावून बघत बसतो, अर्शदीप सिंग ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केल्यानंतर बोलत होता.

रोहित अशी बॅटींग करतो तेव्हा त्याला चेंडू मारावा लागत नाही. तो फक्त योग्य टायमिंग साधतो आणि मग चेंडू लांब लांब जाऊन पडतो. त्याने नेमक्या वेळी केलेल्या खेळीने संघाला दणकट धावफलक उभारता आला. एकच सांगतो, चेहऱ्यावर दाखवले नाही तरी रोहितच्या अफलातून खेळीने ऑसी संघ मनातून हादरला होता असेच मला वाटले, अर्शदीप म्हणाला.

मी तर असे फटके मारायचा साधा विचारही करू शकत नाही, रोहितची स्तुती करताना राहुल द्रविड विमानतळावर भेटला तेव्हा म्हणाला. मला त्याची खेळी समोरून बघायला जास्त आवडली असती, विराट कोहलीने रोहितच्या खेळीबद्दल बोलताना सूचक उद्गार काढले.

Rohit Sharma Batting
Euro 2024 : बदली खेळाडू गतविजेत्या इटलीचा तारणहार; भरपाई वेळेतील गोलमुळे क्रोएशियाविरुद्ध बरोबरी

सोमवारी मध्यरात्री भारतीय संघ सेंट ल्युसियाहून जॉर्जटाऊन, गयानाला पोहोचला. विमानतळावर रात्री साडेबाराला उत्साही लोक ढोलक वाजवत विमानाला लागून स्वागत केलेले बघून खेळाडूंना काय करावे समजत नव्हते.

गयानाचा विमानतळ हॉटेलपासून परत चांगलाच लांब होता. दमल्या अवस्थेतही खेळाडूंना हसू यायला लागले, कारण बांगलादेशला पराभूत करून अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरी गाठली. गतविजेत्या ऑस्ट्रलियन संघाला सुपर आठ फेरीतून मायदेशी परतावे लागले. आता एक दिवस पूर्ण विश्रांती घेऊन संघ बुधवारी उपांत्य सामन्याच्या तयारीसाठी सराव करणार आहे.

Rohit Sharma Batting
T20 World Cup: राशिदची करामत! अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळवून देणाऱ्या सामन्यात रचला विश्वविक्रम

खेळाडू आयसीसीच्या संयोजनावर चांगलेच नाराज होते. कोणतेच वेळापत्रक प्रवासाचे पाळले जात नाही. सामना झाला की दुसऱ्या दिवशी स्थानिक मैदानाचा अंदाज घेण्यासाठी सराव करावा लागतो आणि लगेच नंतर सामना खेळावा लागतो. चांगलीच दमछाक होते आहे, कारण कॅरेबीयन बेटांवरची गरम हवा ताकद काढून घेत आहे.

खेळाडूंना विश्रांती पुरेशी मिळत नाहीये, ज्याचा परिणाम खेळावर होऊ नये म्हणून झगडावे लागते आहे. पण कॅरेबीयन बेटांवरील एक दोन तासांच्या विमान प्रवासात मिळाले तर पाणी फक्त दिले जाते बाकी काहीही नसते, खेळाडू कहाणी सांगत होते. खेळाडूंना असे विचित्र प्रवास करून सामने खेळणे चांगलेच कठीण जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.