Ind vs Aus 3rd Test Indore Pitch Controversy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळपट्टीवरून बराच गदारोळ झाला होता. नागपूर, दिल्ली आणि इंदूर येथे झालेले पहिले तीन कसोटी सामने तीन दिवसांत संपले, तर अहमदाबाद कसोटी सामन्यात फलंदाजांनी धावा केल्या.
इंदूर कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर कारवाई करत आयसीसीने सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या अहवालाच्या आधारे खेळपट्टीला खराब म्हटले आणि तीन डिमेरिट गुण दिले.
आयसीसीच्या या कठोर निर्णयामुळे बीसीसीआय नाराज झाला आणि इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग बदलण्याचे आवाहन केले. बीसीसीआयच्या आवाहनानंतर आयसीसीने इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग बदलले आहे. आता ICCने इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग सरासरीपेक्षा कमी केले आहे. त्याला फक्त एक डिमर्जिंग पॉइंट मिळाला आहे.
होळकर स्टेडियमला आयसीसीने तीन डिमेरिट गुण दिले होते. खेळपट्टीबाबत सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांना अहवाल सादर केल्यानंतर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्याशी चर्चा केल्यानंतर परिषदेने हा निर्णय घेतला. यानंतर बीसीसीआयने आयसीसीच्या निर्णयाविरोधात अपील केले.
आयसीसीच्या पॅनेलने या प्रकरणाची तपासणी करून निर्णयाचा आढावा घेतल्यानंतर खेळपट्टीचे रेटिंग बदलले आहे. आता रेटिंगमधील बदलामुळे डिमेरिट पॉइंट्सही कमी झाले आहेत. तीन डिमेरिट पॉइंट्सऐवजी आता खेळपट्टीला फक्त एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे.
इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचे वर्चस्व होते. पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट पडल्या. संपूर्ण सामन्यात फिरकीपटूंनी 31 पैकी 26 विकेट घेतल्या. ती कसोटी दोन दिवस आणि एक सत्र चालली, ज्यात ऑस्ट्रेलियन संघ नऊ विकेट्सने जिंकला. इंदूर कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने WTC फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले होते. त्यानंतर काही दिवसांनी टीम इंडियानेही फायनलमध्ये प्रवेश केला.
आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखाद्या मैदानाच्या खेळपट्टीला पाच वर्षांच्या कालावधीत पाच किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट्स मिळाले, तर त्याला एका वर्षासाठी आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास बंदी येते. आता आयसीसीच्या निर्णयामुळे भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयसीसीने खेळपट्ट्यांचे मूल्यांकन एकूण सहा श्रेणींमध्ये विभागले आहे. यात खूप चांगले, चांगले, सरासरी, सरासरीपेक्षा कमी, खराब आणि अनफिट यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.