IND vs AUS: भरतची एक छोटी चूक अन् चाहत्यांना पुन्हा आली पंतची आठवण!

KS Bharat dropped catch video
KS Bharat dropped catch video
Updated on

KS Bharat Drop Catch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा चौथा आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात आहे. कर्णधार रोहित शर्माने केएस भरतला पुन्हा एकदा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिले, पण तो या मालिकेत आतापर्यंत फारशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळेच चाहते भरतवर नाराज आहेत. दरम्यान, केएस भरतने एक सोपा झेल सोडला, त्यामुळे आता सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप उसळला आहे.

KS Bharat dropped catch video
Ind Vs Aus: भारत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कसोटी पाहण्यासाठी मैदानात, कर्णधारांना दिलं खास गिफ्ट

केएस भरतने उमेश यादवच्या षटकात हा झेल सोडला. उमेश यादवने आपल्या वेगवान चेंडूने ट्रॅव्हिस हेडला थक्क केले. चेंडू फलंदाजाच्या बॅटची कड घेऊन केएस भरतपर्यंत गेला. येथे भरतला सोपा झेल घेण्याची संधी होती, परंतु तो तसे करू शकला नाही आणि त्याने मोठी चूक केली. केएस भरतच्या ग्लोव्हजपर्यंत पोहोचल्याने त्याचा चेंडू चुकला. त्यामुळेच आता चाहत्यांच्या संतापाला उधाण आले आहे.

KS Bharat dropped catch video
WTC 2023 : श्रीलंकेच्या पराभवासाठी भारतीयांचे देव पाण्यात! लंकेचा आज किवीविरुद्ध कसोटी सामना

एका चाहत्यांने ट्विटरवर ईशान किशनचा डगआउटमध्ये बसलेला फोटो शेअर करत लिहिले की, केएस भरतऐवजी ईशानचा संघात समावेश करायला हवा होता. तर काहीना चाहत्यांना पुन्हा आली पंतची आठवण झाली. अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

KS Bharat dropped catch video
WPL 2023 : कोल्हापूरची शिवाली गाजवणार महिला आयपीएलचं मैदान!

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाने केएस भरतवर विश्वास व्यक्त केला आहे. मात्र त्याला आतापर्यंत कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान देता आले नाही. या मालिकेत भरतने 3 सामन्यात केवळ 57 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या केवळ 23 धावा आहे. अशा परिस्थितीत आता त्याच्या जागी ईशान किशनला कसोटी संघात स्थान द्यावे, असे चाहत्यांना वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.