IND vs AUS Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चार सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळल्या जात आहे. टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असली तरी केएल राहुल त्याच्या खराब कामगिरीमुळे संघासाठी डोकेदुखी बनला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. शेवटचे दोन कसोटी सामने इंदूर आणि अहमदाबाद येथे होणार आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात केएल राहुलचा पत्ता कट होऊ शकतो. टीम इंडियामध्ये त्याच्याच खास मित्राची एन्ट्री होणार आहे. हा खेळाडू अतिशय धोकादायक असून या खेळाडूच्या एंट्रीची बातमी ऐकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघात घबराट पसरली आहे.
टीम इंडियामध्ये केएल राहुलच्या स्थानावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. केएल राहुलच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान होत आहे.
नागपुरातील पहिल्या कसोटीत टीम इंडियाला केएल राहुलकडून मोठ्या शतकाची अपेक्षा होती, मात्र तो केवळ 20 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामने आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच भारतीय कसोटी संघाची घोषणा करू शकते. खराब कामगिरी पाहता केएल राहुलचा पत्ता कट होऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी सलामीवीर मयंक अग्रवाललाही संधी मिळू शकते. मयंक अग्रवालने रणजी सेमीफायनल सामन्यात द्विशतक झळकावले आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात मयंक अग्रवालने 249 धावांची स्फोटक खेळी केली.
रणजी ट्रॉफीच्या चालू मोसमात कर्नाटककडून खेळणाऱ्या मयंक अग्रवालने 9 सामन्यांच्या 13 डावांमध्ये 82.50 च्या सरासरीने 990 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने तीन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत.
अशा परिस्थितीत केएल राहुलला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटीत मयंक अग्रवालला सलामी केल्या जाऊ शकते.
शेवटच्या 2 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ असा असेल -
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), सरफराज खान, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.