IND vs AUS: कोच राहुल द्रविडने दुसऱ्या टेस्टची प्लेइंग-11 केले स्पष्ट; 'या' दिग्गज खेळाडूची संघात एंट्री?

rahul dravid-big-statement team-india-playing-11
rahul dravid-big-statement team-india-playing-11sakal
Updated on

India vs Australia 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळल्या जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा काही धक्कादायक निर्णय घेऊन प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकतो. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहे.

rahul dravid-big-statement team-india-playing-11
IND vs AUS 2nd Test : भारतीय संघाला शेवटच्या मिनिटाला सोडावे लागले हॉटेल; दिल्लीत नेमकं काय झालं?

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचे पुनरागमन करणे अत्यंत कठीण असल्याचे राहुल द्रविडच्या वक्तव्यावरून स्पष्ट केले.

राहुल द्रविडने स्पष्टपणे सांगितले की श्रेयस अय्यर खेळण्याच्या स्थितीत असेल तरच तो कसोटी संघात 'वापसी' करेल. गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान श्रेयस अय्यरला पाठीसा दुखापत झाली. तरीही श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही.

rahul dravid-big-statement team-india-playing-11
IND vs AUS: लाडक्या राहुलची होणार उचलबांगडी! रणजी द्विशतक ठोकणारा धाकड फलंदाज येणार संघात?

अशा स्थितीत श्रेयस अय्यरचे दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणे अत्यंत कठीण असल्याचे राहुल द्रविडच्या वक्तव्यावरून स्पष्ट केले. श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटी सामन्यात न खेळल्यास सूर्यकुमार यादवला पाचव्या क्रमांकावर उतरवले जाईल. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटीत नागपूरमधील पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दिल्लीत होणारा दुसरा कसोटी सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभव करणे शक्य होणार नाही.

हे दिल्ली कसोटीत भारताचे प्लेइंग 11 असू शकते :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.