IND vs AUS : हरभजनची मध्यस्थी आली कामी! अखेर जडेजा मांजरेकर वाद मिटला

ravindra jadeja sanjay manjrekar-hugged-each-other-before
ravindra jadeja sanjay manjrekar-hugged-each-other-before
Updated on

IND vs AUS Test : नागपूर आणि दिल्ली कसोटीत फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाला अडकवणाऱ्या भारतीय संघाने इंदूरमधील तिसऱ्या कसोटीतही टाकलेला हा फास बुमरँग झाला. नऊ विकेटच्या मोठ्या पराभवाचा आणि तेही अडीच दिवसांच्या आत सामना करण्याची नामुष्की ओढावली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात प्रवेश केला; तर या पराभवामुळे भारतीयांचा जीव मात्र टांगणीला लागला.

ravindra jadeja sanjay manjrekar-hugged-each-other-before
IND vs AUS : इंदूर कसोटीतील पराभवानंतर दिग्गज खेळाडूने विराटवर केले धक्कादायक विधान!

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी मैदानावर एक रंजक घटना घडली. खेळ सुरू होण्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सचे अँकर जतीन सप्रू यांच्यासह माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि संजय मांजरेकर सामन्याचे विश्लेषण करत होते. त्यानंतर अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाही तेथे पोहोचला.

प्रथम त्याने जतिन सप्रू आणि हरभजन सिंग यांच्याशी हस्तांदोलन केले, त्यानंतर तो संजय मांजरेकर यांना मिठी मारताना दिसला. व्हिडिओमध्ये जडेजा आणि मांजरेकर एकमेकांशी बोलतानाही दिसत होते. अखेर जडेजा मांजरेकर वाद मिटला.

रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांच्यात बरेच दिवस शाब्दिक युद्ध सुरू होते. एकेकाळी माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनीही त्यांना रिटेल क्रिकेटर म्हटले होते. ज्यावर बराच गदारोळ झाला.

ravindra jadeja sanjay manjrekar-hugged-each-other-before
IND vs AUS: अडीच दिवसात खेळ खल्लास! भारत WTC अंतिम फेरीत खेळणार की बाहेर? जाणून घ्या पुढचे गणित

पहिल्या दोन दिवसांत 30 विकेट जाण्याची परिस्थिती ओढावलेल्या या सामन्यात तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांची गरज होती, त्यांनी उस्मान ख्वाजच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले आणि मालिकेतील पिछाडी 1-2 अशी कमी केली.

खेळपट्टी कशीही असली तरी 76 धावांचे संरक्षण करणे सोपे नव्हते. केवळ चमत्कारच भारताला वाचवू शकणार होता. तिसऱ्या दिवशी भारताचे अशक्य विजयाचे दिवास्वप्न खेळ चालू झाल्यावर काही काळ रंगले. अश्विनने पहिल्याच षटकात उस्मान ख्वाजाला बाद केले. त्यानंतर ट्रॅव्हीस हेड आणि मार्नस लघुशेनने कोणतीही संधी भारतीय संघाला दिली नाही. बचावासोबत दणकट फटके मारून दोघांनी विजयाकडे धीराने वाटचाल केली.

ravindra jadeja sanjay manjrekar-hugged-each-other-before
WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा आजपासून रंगणार थरार

रोहित शमनि अश्विन-जडेजाचा मारा मुख्य करून वापरून बघितला आणि सामना हातापासून लांब जायला लागल्यावर उमेश यादवला थोडी गोलंदाजी दिली. हेडने आक्रमक खेळ करताना नाबाद 49 धावा केल्या. ज्यात सहा चौकार, एक षटकार होता. लबुशेनने नाबाद 28 धावा करून हेडला चांगली साथ दिली. 18.5 षटकांतच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गरजेच्या धावा पार केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.