Jasprit Bumrah IND vs AUS Test Series : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची तंदुरुस्ती यांचा पाठशिवणीचा खेळ पुन्हा सुरू झाला. श्रीलंकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या एकदिवस अगोर बुमराहने पुन्हा माघार घेतली.
एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बुमराहची संघात निवड होऊ शकत नाही. बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, बुमराहची न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे आणि 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवड केली जाणार नाही. बुमराह आयपीएलला देशापेक्षा जास्त प्राधान्य देत आहे. हा एक प्रश्न पडतो...
बीसीसीआयच्या सूत्रांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, बुमराहची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी निवड होणार नाही. तो बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेतील चारही कसोटी खेळू शकेल की नाही याबाबतचा निर्णय या महिन्याच्या अखेरीस घेतला जाईल.
त्याचवेळी बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने असेही सांगितले की, न्यूझीलंड मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. तो यापुढे त्याच्या पुनर्वसनावर काम करेल. सध्या तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयार होईल की नाही हे सांगता येत नाही. अजून काही आठवडे बाकी आहेत.
बुमराहचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन सलग तिसऱ्या द्विपक्षीय मालिकेसाठी लांबल्याने चाहते संतापले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याच्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्ससाठी खेळण्यासाठी नेहमीच तंदुरुस्त असतो पण टीम इंडियासाठी नाही.
स्ट्रेस फॅक्चरमुळे बुमरा सप्टेंबरपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. टी-20 विश्वकरंडकापूर्वी त्याला खेळवण्याची केलेली घाई नडली होती. आताही तसाच काहीसा प्रकार होण्याची शक्यता होती. बुमराह तंदुरुस्त झाला म्हणून त्याची श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. यातील पहिला सामना आज संघात दाखल होणे अपेक्षित होते, परंतु तो तंदुरुस्त नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले.
स्ट्रेस फॅक्चरवर उपचार केल्यानंतर बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करत होता. पुनरागमन करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आल्यामुळेच त्याची भारतीय संघ निवडल्यानंतर अतिरिक्त खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती.
काय घडले...
२७ डिसेंबर : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराशिवाय संघनिवड
३ जानेवारी : क्रिकेट अकादमीकडून बुमरा तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट, त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड
९ जानेवारी : अजूनही पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे बुमराची माघार : बीसीसीआयने केले जाहीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.