IND vs AUS: 'मला आयुष्यभर लागले...', कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यानंतर मॅक्सवेलला आले रडू

Glenn Maxwell On Australia Tour Of India:
Glenn Maxwell On Australia Tour Of India:
Updated on

Glenn Maxwell On Australia Tour Of India: पुढील महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्‍या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने मोठे विधान केले आहे. ग्लेन मॅक्सवेल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळु शकणार नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Glenn Maxwell On Australia Tour Of India:
IND vs SA: पावसाचा तांडव! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्याने मॅक्सवेलही नाराज झाला आणि रडू आले. दुखापतीमुळे आगामी भारत दौऱ्यात न खेळल्याने त्याला आयुष्यभर त्रास होईल, असे ग्लेन मॅक्सवेल म्हणाला. बिग बॅश लीगच्या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना मॅक्सवेल म्हणाला, 'कदाचित ही गोष्ट मला आयुष्यभर सतावील. आपल्या संघसहकाऱ्यांना खेळताना पाहण्याची संधी मिळणे आनंददायक आहे, विशेषतः भारतात. माझ्या मते ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यासाठी सर्वोत्तम संघ मिळाला आहे.

Glenn Maxwell On Australia Tour Of India:
IND vs NZ: करो या मरो! दोन दिग्गज फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय; पृथ्वी उघडणार का टीम इंडियाचे दरवाजे

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची सुरुवात 09 फेब्रुवारीला नागपुरात पहिल्या कसोटीने होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने 2004 पासून भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. कसोटीनंतर तीन एकदिवसीय सामने होतील. मॅक्सवेल कसोटी मालिकेत खेळू शकणार नसला तरी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तो संघात पुनरागमन करू शकतो.

Glenn Maxwell On Australia Tour Of India:
U-19 T20 WC: शेफाली वर्मा इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत-इंग्लंडमध्ये जेतेपदासाठी चुरस

कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

  • 9 ते 13 फेब्रुवारी - पहिली कसोटी - नागपूर

  • 17 ते 21 फेब्रुवारी - दुसरी कसोटी - दिल्ली

  • 1 ते 5 मार्च - तिसरी कसोटी - धर्मशाला

  • 9 ते 13 मार्च - चौथी कसोटी - अहमदाबाद

एक दिवसीय मालिका

  • 17 मार्च – पहिली वनडे

  • 19 मार्च - दुसरी वनडे

  • 22 मार्च – तिसरी वनडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.